काही संप्रदायवाले आपल्या संप्रदायाचे महत्त्व इतरांवर बिंबावे; म्हणून त्यांच्या नियतकालिकांत काही जणांना आलेल्या शारीरिक आणि मानसिक स्तरांवरील सकामातील चांगल्या अनुभूती छापतात; पण हजारोंना अनुभूती आल्या नसल्याचे छापत नाहीत. त्यामुळे यांच्याकडे गेलो, तर आपल्या सर्व अडचणी दूर होतील, असे बर्याच जणांना वाटते आणि ते त्या संप्रदायात जातात. त्यांतील बहुतेकांना अनुभूती न आल्याने त्यांचा केवळ त्या संप्रदायावरीलच नाही, तर साधनेवरचा विश्वास उडतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ज्यांना अनुभूती येतात, त्यांचे प्रारब्ध संपत आलेले असते, ते सांगितलेली साधना चिकाटीने करतात किंवा त्यांच्यात भाव असतो. आपणही प्रयत्न केले पाहिजेत.
सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये आणि सनातन संस्थेच्या ग्रंथांत केवळ आध्यात्मिक स्तरावरच्या सूक्ष्मातील अनुभूती छापण्यात येतात. त्यामुळे वाचकांचा अध्यात्मशास्त्रावर विश्वास बसतो आणि ते साधना करण्यास आरंभ करतात.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले