भारतात भयानक परिस्थिती असूनही पाश्चात्त्यांच्या तुलनेने मानसिक तणाव आणि मानसिक विकृती यांचे प्रमाण फार अल्प का आहे ? भारतात इतर देशांप्रमाणे यादवी होऊन राजसत्ता उलथून का टाकली जात नाही ?
३. हिंदूंच्या देवावरील विश्वासामुळे हिंदूंना धनदांडग्यांचा हेवा वाटण्याचे प्रमाण न्यून असणे : हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ते धर्माचरण करत नसले, तरी मध्यमवर्गियांचा आणि विशेषतः खेडेगावातल्या बहुसंख्य लोकांचा देवावर विश्वास आहे. परंपरागत आलेले कुळाचार ते अजूनही पाळतात. विशेषतः स्त्रिया निरनिराळी व्र्रते नेमाने करतात. वारकरी नेमाने आषाढी-कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जातात. अशिक्षित असले, तरी त्यांना पिढ्यान्पिढ्या सत्कृत्य केल्याने, उदा. दुसर्याला साहाय्य केल्याने पुण्य लागते आणि वाईट कर्म केल्याने, उदा. खोटे बोलल्याने, फसवल्यामुळे पाप लागते, हा कर्माचा नियम पटलेला आहे. या व्यतिरिक्त आपल्या पूर्वजन्मींच्या कर्माचीच फळे आपण भोगत आहोत, हेही त्यांच्या मनावर बिंबले आहे. त्यामुळे त्यांना शेजारच्या टोलेजंग बंगल्यात रहाणार्या, प्रत्येकाकडे ४-४ चारचाकी गाड्या असलेल्या, चैन करणार्या श्रीमंतांचा, भ्रष्ट राजकारण्यांचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही. नाहीतर साम्यवादाची पाळमुळे भारतात केव्हाच रोवली असती. (क्रमश:)
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले, चेंबुर, मुंबई. (१७.७.२०१३)