आपल्याला जेव्हा इतरांच्या दोषांचा राग येतो, तेव्हा आपण आपल्यावरील आवरणाकडे लक्ष देत असतो; पण त्याच्यातील कार्य करणार्या भगवंताकडे आपले लक्ष नसते. आपण त्यांच्या दोषांशी एकरूप न होता त्यांच्या स्थितीत जाऊन त्यांना दोष घालवायला कसे साहाय्य करता येईल ?, याचा विचार करायला हवा. आपण त्यांच्याकडे केवळ बाह्यांगाने न पहाता त्यांच्यातील अंतरात्म्याकडे लक्ष द्यायला हवे.
– प.पू. पांडे महाराज (संग्राहक – डॉ. मंगलकुमार कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.५.२०१५))