इतर सर्व धर्मांचे संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक नसण्याची कारणे : बौद्ध, जैन, ईसाई, इस्लाम इत्यादी धर्मांचे (खरे तर संप्रदायांचे) संस्थापक आहेत; पण हिंदु धर्माचा कोणीच संस्थापक नाही. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. धर्म इतका अथांग आहे की, कोणी एक त्याची स्थापना करू शकत नाही.
२. धर्मात कालमहात्म्यानुसार जो पालट होतो, तो सांगायला इतर धर्मांचे संस्थापक जिवंत नसतात. उलट हिंदु धर्मात भगवंत अवतार घेऊन त्या त्या युगासाठी योग्य तो धर्म सांगतो.
यामुळे इतर सर्व धर्म ज्याची उत्पत्ती होते, ते काही काळ अस्तित्वात असते आणि नंतर नाश पावते, या सिद्धांतानुसार नाश पावतात. याउलट हिंदु धर्माची उत्पत्ती झालेली नसल्याने तो अविनाशी आहे, म्हणजे अनंत काळ टिकणारा आहे.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले