प.पू. डॉक्टर संमोहन उपचारतज्ञ असण्याचा त्यांना आध्यात्मिक संशोधनात झालेला लाभ : मी साधनेत खूप उशिरा, म्हणजे ४२ व्या वर्षी आलो, याचे मला वाईट वाटायचे. आज लक्षात आले की, प्रत्यक्षात मला त्याचा आध्यात्मिक क्षेत्रातही लाभच झाला आहे.
१. मनोरुग्णांवर उपाय करण्यासाठी काही संमोहन उपचारपद्धती शोधल्या. त्यामुळे स्वभावदोष आणि अहं दूर कसे करायचे, हे रुग्णांना शिकता आल्याने त्यांचे मनोविकार बरे होण्यास साहाय्य झाले. त्या उपचारपद्धतींचा वापर गुरुकृपायोगानुसार शिकवल्या जाणार्या साधनेत केल्यामुळे साधकांना अध्यात्मात प्रगती करणे सुलभ झाले आहे.
२. संमोहन उपचारतज्ञ म्हणून संशोधन केल्यामुळे विज्ञानाच्या दृष्टीकोनातून विश्लेषण, संशोधन कसे करायचे, हे शिकायला मिळाले. त्याचाच उपयोग अध्यात्मशास्त्रात करता आला.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले