कुठे दुष्काळावर वरवरचे उपाय करणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते, तर कुठे बार्शीचे अश्वमेधयाजी पू. नाना काळे ! : दुष्काळ का होतो, हे समजून न घेता, टँकरने आणि आगगाडीने पाणी पाठवू !, असे राज्यकर्ते म्हणतात. अवर्षणग्रस्त भागातील साहाय्यातही भ्रष्टाचार करतात. मानवाच्या पापाचे भोग त्याला भोगावे लागत आहेत. ते अल्प करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे एकही राजकारणी सांगत नाही. याउलट बार्शीचे अश्वमेधयाजी पू. नाना काळे यांच्या सारखे संत निसर्गदेवतेची कृपा व्हावी म्हणून लाखो रूपये खर्च करून १२ सोमयाग करत आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले