मानसिक स्तर वरवरचे तात्कालिक साहाय्य करणारा असतो, तर आध्यात्मिक स्तर अडचण मुळापासून दूर करणारा असतो. हे पुढील उदाहरणावरून लक्षात येईल.
१. मानसिक स्तर : भुकेलेल्याला अन्न द्या, असे म्हणणारे मानसिक स्तरावरचे असतात. ते भुकेलेला भुकेला का आहे ?, याचा विचार करत नाहीत. त्यामुळे भुकेल्याला कोणालातरी आयुष्यभर अन्न द्यावे लागते.
२. आध्यात्मिक स्तर : साधना कर. देव अन्न देईल, असे म्हणणारे आध्यात्मिक स्तरावरचे असतात. ते भुकेलेला भुकेला का आहे ?, याचा विचार करतात आणि त्याला साधना करण्यास सांगतात. साधनेमुळे भुकेलेल्याचे प्रारब्ध पालटते. त्यामुळे कोणालातरी त्याला आयुष्यभर अन्न द्यावे लागत नाही.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले