संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्ध करून देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

जे वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी, तसेच साधक छपाईसाठी पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी संपर्क साधावा.

प्रजासत्ताकदिनाच्‍या निमित्ताने सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिन आहे. त्‍या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्‍पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्‍याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्‍यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्‍य यांचे अधिकाधिक वितरण करण्‍यासाठी प्रयत्न करावेत.

संगणक दुरुस्तीच्या अंतर्गत पुढील सेवांमध्ये सहभागी व्हा !

सध्या संगणकांची देखभाल आणि दुरुस्ती यांसाठी उपलब्ध साधकसंख्या अपुरी पडत आहे. पुढील सेवांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात साधकांची आवश्यकता आहे.

‘अ‍ॅप’मधील माहिती सामान्‍य हिंदूंच्‍या दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ! – महर्षि आनंद गुरुजी, प्रख्‍यात ज्‍योतिषी

सनातन संस्‍था निर्मित ‘सनातन पंचांग २०२३’च्‍या कन्‍नड भाषेतील ‘अँड्रॉईड अ‍ॅप’चे लोकार्पण महर्षि आनंद गुरुजी यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले. या वेळी महर्षि आनंद गुरुजी म्‍हणाले की, ‘सनातन पंचांग २०२३’च्‍या अ‍ॅपमध्‍ये पंचांग आणि शुभ मुहूर्त, सण-व्रते, धर्मशिक्षण, राष्‍ट्र-धर्म रक्षण, आयुर्वेद आदी विविध विषयांवर उपयुक्‍त माहिती देण्‍यात आली आहे.

चंद्रोदय कधी होतो ?

सामान्यतः बोलीभाषेत आपण ‘सूर्य सकाळी अन् चंद्र रात्री उदय पावतो’, असे म्हणतो. सूर्याच्या संदर्भात हे योग्य असले, तरी चंद्राच्या बाबतीत तसे नाही. चंद्रोदय प्रतिदिन वेगवेगळ्या वेळी होतो. त्याविषयीची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.

देवतेच्‍या यंत्रामध्‍ये त्रासदायक स्‍पंदने आली असल्‍यास त्‍यावर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करा !

नकारात्‍मक स्‍पंदने असलेल्‍या देवतेच्‍या यंत्रावर रिकाम्‍या खोक्‍यांचे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करावेत. रिकाम्‍या खोक्‍यातील पोकळीमध्‍ये त्रासदायक शक्‍ती खेचली गेल्‍याने आध्‍यात्मिक लाभ होतात.

वेलवर्गीय भाज्‍यांच्‍या लागवडीसाठी सुटसुटीत (पोर्टेबल) मांडव

आपण वेलवर्गीय भाज्‍या किंवा फुले लावतो, तेव्‍हा त्‍या वेलींना वर चढण्‍यासाठी आधार देण्‍याची आवश्‍यकता असते. हा आधार मांडवाद्वारे कशा प्रकारे आणि घरातील कोणते साहित्‍य घेऊन द्यायचा ? म्‍हणजे वेलवर्गीय भाज्‍यांची लागवड आणि त्‍या मिळवणे सोपे होईल अन् त्‍यासाठी ‘सुटसुटीत मांडव स्‍वतःच कसा बनवायचा’, हे या लेखाद्वारे पाहू.

भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे आणि ‘ईगल ब्रिगेड फाऊंडेशन’ या संस्‍थेचे संस्‍थापक विश्‍वनाथ बिवलकर यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला भेट !

देवद (पनवेल) येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमाला मुलुंड (पू.) येथील भाजपचे माजी नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांनी, तसेच कला, क्रीडा आणि मुलाखत यांसाठी मुलांना मार्गदर्शन करणार्‍या ‘ईगल ब्रिगेड फाऊंडेशन’ या संस्‍थेचे संस्‍थापक अन् कोलशेत (ठाणे) येथील श्री. विश्‍वनाथ बिवलकर यांनी भेट दिली

‘श्रीगीता पठण आभासी (ऑनलाईन) अंतिम स्‍पर्धे’त नागपूर येथे सनातनचा बालसाधक कु. आदिनाथ देशपांडे (वय ८ वर्षे) याला प्रथम पारितोषिक !

श्रीचिन्‍मय मिशनच्‍या वतीने ‘श्रीगीता पठण आभासी अंतिम स्‍पर्धा ’ डिसेंबर २०२२ मध्‍ये आयोजित करण्‍यात आली होती. त्‍या स्‍पर्धेत सनातनचा बालसाधक कु. आदिनाथ अंकुश देशपांडे (वय ८ वर्षे) याला प्रथम पारितोषिक म्‍हणून एक ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि स्‍वामी विवेकानंदांविषयीचे पुस्‍तक मिळाले.

नैसर्गिक कालविभाग : वर्ष, अयन, ऋतू, मास आणि पक्ष

सूर्य आणि चंद्र हे कालपुरुषाचे नेत्र समजले जातात. सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमणांमुळे आपल्याला काळ मोजता येतो अन् त्याचा व्यवहारात उपयोगही करता येतो. ‘वर्ष, अयन, ऋतू, मास आणि पक्ष’ या नैसर्गिक कालविभागांची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.