सनातन संस्‍था निर्मित ‘गणेश पूजा आणि आरती’ अ‍ॅपवरील ‘ऑडियो’ लावून पूजा करतांना आलेली अनुभूती !

‘१०.९.२०२१ (भाद्रपद शुक्‍ल चतुर्थी) या दिवशी मी ‘सनातन संस्‍था’निर्मित ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘अ‍ॅप’च्‍या साहाय्‍याने घरात पार्थिव श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्‍ठापना करत होतो. प्राणप्रतिष्‍ठापनेचे मंत्र चालू झाल्‍यावर मी माझ्‍या उजव्‍या हाताची बोटे श्री गणेशमूर्तीच्‍या हृदयावर ठेवली. तेव्‍हा मला श्री गणेशमूर्तीच्‍या हृदयाच्‍या ठिकाणी स्‍पंदने जाणवू लागली.

‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यासाठी मुंबईमध्ये झालेल्या हिंदु जनआक्रोश मोर्च्यात सनातन संस्था सहभागी !

दादर येथील शिवाजी पार्क येथून २९ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने हिंदु बंधू-भगिनी सहभागी झाल्या होत्या. राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा आणावा, अशी मागणी या मोर्च्यामध्ये करण्यात आली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मोहिमेसाठी जाणार्‍या धारकर्‍यांना सनातन संस्थेकडून शुभेच्छा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी (मार्गे श्री वरसुबाई) अशी होत आहे. या मोहिमेसाठी सांगलीतून धारकरी २८ जानेवारीला रवाना झाले. रवाना होणार्‍या धारकर्‍यांना सनातन संस्थेकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

वारुंजी (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेचे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. कांतावती देशमुख यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर उपस्थित महिलांना कुलदेवतेच्या उपासनेचे, तसेच श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात आनंद कसा शोधायचा ? यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

जमशेदपूर येथील सनातन संस्थेचा बालसाधक चि. चैतन्य कृष्णा याला ‘हॉर्स रायडिंग शो’मध्ये सुवर्णपदक प्राप्त !

‘टाटा स्टील’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘हॉर्स रायडिंग शो’मध्ये सनातनचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक चि. चैतन्य कृष्णा (वय ७ वर्षे) याने ‘ज्युनिअर ग्रुप’च्या एका कार्यक्रमामध्ये सुवर्णपदक मिळवले, तसेच त्याच्या गटातून ‘बेस्ट रायडर’ची ट्रॉफी (पारितोषिक) प्राप्त केली आहे.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या डॉ. रणजित काशिद यांना संशोधनातील पुरस्कार घोषित !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारे विविध पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. संशोधनातील पुरस्कार डॉ. रणजित काशिद यांना देण्यात येणार आहे. ते सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करतात.

रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला श्रीधर खेर (वय ९१ वर्षे) यांचा देहत्याग !

‘गुरु हेच अवघे विश्व’ असणार्‍या येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. मंगला श्रीधर खेर (वय ९१ वर्षे) यांनी २९ जानेवारीच्या पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी देहत्याग केला. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

शासकीय वाचनालयांत, तसेच शाळा आणि महाविद्यालये येथील ग्रंथालयांमध्ये सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ ठेवण्यासाठी प्रयत्न करा !

प्रतिवर्षी मार्चमध्ये, तसेच जुलै ते सप्टेंबर या काळात शासकीय वाचनालयांना ग्रंथ खरेदीसाठी सरकारकडून अनुदान प्राप्त होते. त्यानंतर त्या वाचनालयाचे संचालक विविध ग्रंथ खरेदी करतात. वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या संदर्भातील अमूल्य ज्ञान सहजसोप्या भाषेत देणारे सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ सर्वत्रच्या वाचनालयांमध्ये ठेवता येतील. यासाठी सर्वत्रच्या साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.

‘जे.एन्.यू.’मधील ब्राह्मणविरोधी घोषणांचा अन्वयार्थ !

नवी देहली येथील ‘जे.एन्.यू.’च्या परिसरातील अनेक भिंतींवर ब्राह्मण आणि व्यापारी यांच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या. या संदर्भात ‘जम्बू द्वीप’ या यू ट्यूब वाहिनीवर सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि ज्येष्ठ पत्रकार तथा ‘एच्.व्ही. टीव्ही’चे संपादक हर्षवर्धन त्रिपाठी यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात कन्‍नड भाषेतील ‘उद्योगपती साधना शिबिर’ पार पडले !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात कन्‍नड भाषेतील ‘उद्योगपती साधना शिबिर’ २० जानेवारी ते २२ जानेवारी पार पडले !