सकाळ वृत्तपत्र समूहाचे मालक श्री. अभिजीत पवार यांना सनातनची श्रीकृष्णाची प्रतिमा भेट

सकाळ वृत्तपत्र समूहाचे मालक तथा म्हापसा गोवा येथील सोमयाग यज्ञाचे यजमान श्री. अभिजीत पवार यांची सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी भेट घेतली.

वाईट शक्तींमुळे होणार्‍या त्रासांवर मात करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायांची क्षमता आणि साधना वाढवा !

‘मनुष्याच्या जीवनात उद्भवणार्‍या ८० टक्के समस्यांमागे प्रारब्ध, अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांचे त्रास, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी आध्यात्मिक कारणे असतात. सध्याच्या कलियुगात बहुतांशी समाज धर्माचरणापासून विन्मुख झाला आहे. हे वाईट शक्तींना पोषक असल्याने त्यांचे प्राबल्य वाढले आहे आणि त्यामुळे त्यांचे मानवांना त्रास देण्याचे प्रमाणही पुष्कळ वाढले आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून उपासनेची शक्ती वाढवा ! – अभय वर्तक, प्रचारक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला शंखनादाने प्रारंभ झाला. व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, रणरािगणी शाखेच्या मुंबई समन्वयक डॉ. (सौ.) दीक्षा पेंडभाजे अन् सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक हे उपस्थित होते. सभेला २ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी खारीचा नाही, तर हनुमंताप्रमाणे वाटा उचला ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनीही मार्गदर्शन केले.या सभेस ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदू उपस्थित होते.

फल-ज्योतिषशास्त्रातील मूलभूत घटक : ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने

फल-ज्योतिषशास्त्र हे ग्रह, राशी आणि कुंडलीतील स्थाने या ३ मूलभूत घटकांवर आधारित आहे. या ३ घटकांमुळे भविष्य दिग्दर्शन करणे शक्य होते. या ३ घटकांची तोंडओळख या लेखाद्वारे करून घेऊया.

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

या प्रदर्शनामध्‍ये शास्‍त्रोक्‍त भाषेत लिहिलेले अध्‍यात्‍म, राष्‍ट्र आणि धर्म, आयुर्वेद, धर्माचरण इत्‍यादी विषयांवरील ग्रंथ ठेवण्‍यात आले होते. तसेच मराठी भाषेवरील अद्वितीय ग्रंथही या प्रदर्शनात उपलब्‍ध होते.

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्यात सनातनचे योगदान मोठे ! – अधिवक्‍ता प्रेमचंद्र झा, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, आदित्‍य वाहिनी

‘आदित्‍य वाहिनी’चे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष आणि ‘गोवर्धन पुरी पीठा’चे राष्‍ट्रीय कार्यक्रम प्रभारी अधिवक्‍ता प्रेमचंद्र झा यांची भेट सनातन संस्‍थेच्‍या साधकांनी घेतली. यावेळी त्यांनी असे गौरवोद्गार काढले.

‘गोबेल्‍स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्‍ट्रभक्‍तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, सनातन संस्‍था

‘बीबीसी’च्‍या ‘डॉक्‍युमेंट्री’मध्‍ये मोदीजींवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण केले आहे. हे प्रश्‍नचिन्‍ह केवळ मोदींवर नसून भारताच्‍या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे.

‘भक्‍त घडेल’, असा मंदिर व्‍यवस्‍थापनाचा अभ्‍यासक्रम असायला हवा ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

जळगाव येथे पार पडलेल्‍या महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषदेमध्‍ये ‘मंदिराचे सुप्रबंधन (सुव्‍यवस्‍थापन)’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्‍यात आला होता. यामध्‍ये महाराष्‍ट्रातील विविध भागांतील मंदिरांचे विश्‍वस्‍त, तसेच सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस सहभागी झाले होते.