महाशिवरात्री निमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ५० हून अधिक ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन !

महाशिवरात्री निमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने, ग्रंथप्रदर्शन, फ्लेक्स प्रदर्शन, फलक लेखन, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन व्याख्याने आदी माध्यमांतून व्यापक स्तरावर धर्म आणि अध्यात्म प्रसार करण्यात आला.

‘पंचमहाभूत लोकोत्सवा’त सनातन संस्थेचा कक्ष !

या महोत्सवात सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष ‘डी-७०’ येथे लावण्यात आला आहे. हा कक्ष सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेत जिज्ञासूंना पहाण्यासाठी खुला असणार आहे.

राष्‍ट्र आणि धर्म या कार्यांसाठी समर्पित असलेल्‍या पूर्णवेळ साधकांच्‍या वापरातील गाद्या नव्‍याने बनवण्‍यासाठी गादी बनवण्‍याचे कौशल्‍य असणार्‍यांची आवश्‍यकता !

सनातनचे विविध ठिकाणचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे अनेक वर्षांपासून साधक रहात असून तेथील गाद्या बर्‍याच काळापासून वापरात आहेत. या गाद्यांमधील कापूस पिंजून त्‍यापासून नवीन गादी बनवण्‍याची सेवा करायची आहे.

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे ४०० हून अधिक प्रदर्शन कक्ष !

सनातनच्या या ग्रंथप्रदर्शनाला विविध पक्षांचे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी पहार्‍यासाठी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांनीही ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेतली.

महाशिवरात्री निमित्त सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शन स्थळी मान्यवरांच्या भेटी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे (उजवीकडे) यांनी पेण येथील प्रदर्शनकक्षाला भेट दिली. या वेळी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘नटराज वंदना’ विशेषांक भेट देण्यात आला.

संत श्री गजानन महाराज, अक्‍कलकोट यांच्‍या पावन पादुकांचे सनातन आश्रम, रामनाथी येथे शुभागमन !

सनातनच्‍या आश्रमात अक्‍कलकोट येथील श्री स्‍वामी समर्थ यांच्‍या परंपरेतील थोर संत श्री गजानन महाराज यांच्‍या पावन पादुकांचे शुभागमन झाले. म्‍हापसा, गोवा येथे होत असलेल्‍या सोमयागामध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी श्री गजानन महाराज यांचे उत्तराधिकारी डॉ. राजीमवाले यांचे आणि श्रीपादुकांचे गोमंतकात आगमन झाले आहे.

पुणे येथे सनातन संस्थेकडून श्री गजानन महाराज प्रकटदिन निमित्त ग्रंथ प्रदर्शन !

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त १३ फेब्रुवारी या दिवशी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अमेरिका येथे सनातनच्या बालसाधिकेचे शाळेत ‘भरतनाट्यम्’चे सादरीकरण !

इयत्ता चौथीमध्ये शिकणारी सनातनची बालसाधिका कु. ईश्वरी कुलकर्णी (वय ९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हिने या उपक्रमात ‘भरतनाट्यम्’वर आधारित ‘नमो नमो भारताम्बे’ या भारतमातेच्या संस्कृत गाण्यावर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली.

महाशिवरात्री निमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन यांचे प्रदर्शन !

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेने जिल्ह्यात अनेक शिवमंदिरांमध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्योतिषशास्त्र : काळाची अनुकूलता आणि प्रतिकूलता सांगणारे शास्त्र !

ज्योतिषशास्त्र म्हणजे ‘भविष्य वर्तवण्याचे शास्त्र’ असा बहुतेकांचा समज असतो आणि त्यामुळे ज्योतिषीने आपले विस्तृत भविष्य सांगावे, असे अनेकांना वाटते. ज्योतिष हे भविष्य सांगण्याचे शास्त्र आहे का, हे आपण या लेखाद्वारे जाणून घेऊ. त्या अगोदर ज्योतिषशास्त्राचे प्रयोजन समजून घेऊया.