मूळ संभाजीनगर येथील आणि आता गोव्यात वास्तव्यास असलेले श्री. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) सनातनच्या १२४ व्या संतपदी विराजमान !
पू. सत्यनारायण तिवारी हे गेल्या २ वर्षांपासून तीव्र शारीरिक त्रासांमुळे रुग्णाईत असल्यामुळे त्यांना सतत झोपून रहावे लागते, तसेच त्यांना मेंदूच्या आजारामुळे विस्मृतीही होते. अशा स्थितीतही त्यांनी आंतरिक साधनेच्या बळावर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने संतपद गाठले. फोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी हा संतसन्मान सोहळा पार पडला.