जिवंतपणा जाणवणारे आणि चैतन्याची अनुभूती देणारे नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान !

जन्मस्थानाच्या वास्तूला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी अत्यंत भावपूर्ण वंदन केले. संपूर्ण वास्तू आणि वास्तूच्या आजूबाजूचा परिसर पहातांना त्याविषयी त्या अतिशय जिज्ञासेने अन् बारकाईने जाणून घेत होत्या.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हंपी (कर्नाटक) येथील माल्यवंत पर्वताच्या स्थानी असलेल्या ‘श्री रघुनाथ मंदिरा’चे घेतलेले दर्शन !

हे भव्य मंदिर पहातांना ‘त्या काळी एका पर्वतावर एवढे मोठे दगड नेऊन मंदिर कसे बांधले असेल ?’, याची कल्पनाही करवत नाही. खरेच, आपले महान पूर्वज, दैवी आणि धर्मशास्त्रसंपन्न शिल्पकार अन् त्यांना राजाश्रय देणारे राजे यांना आमचा कोटीशः प्रणाम !

साधकांना स्वतःच्या स्थूल रूपात अडकू न देता त्यांना घडवणारे आणि ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारे अवतारी दिव्यात्मा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कसे घडवले, याविषयी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भावपूर्ण मनोगत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव निमित्त बिहार आणि उत्तरप्रदेश येथील विविध मंदिरांमध्ये प्रार्थना

सैदपूर येथील जुन्या महादेव मंदिरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करून आशीर्वाद घेत असतांना १०० हून अधिक भाविक उपस्थित होते.

हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवतांना साकडे !

हिंदु राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी देवतांच्या चरणी साकडे घालण्यात आले, तसेच काही ठिकाणी मंदिर स्वच्छता करून साकडे घालण्यात आले.

सनातनच्‍या आश्रमांत पावसाळ्‍याच्‍या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्‍याची आवश्‍यकता !

आगामी पावसाळ्‍याच्‍या दृष्‍टीने आश्रम आणि सेवाकेंद्रे या ठिकाणी पूर्वसिद्धता करण्‍यात येत आहे. आश्रम परिसरातील सर्व साहित्‍य सुस्‍थितीत रहाण्‍याकरता तात्‍पुरत्‍या निवारा शेड बनवायच्‍या आहेत. त्‍यासाठी फ्‍लेक्‍स, प्‍लास्‍टिक आणि ‘सिलपोलिन’ यांची, तसेच लोखंडी अन् प्‍लास्‍टिक पत्र्यांची (‘कॉरुगेटेड शीट्‍स’ची) आवश्‍यकता आहे.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मंदिरांमध्ये साकडे आणि मंदिर स्वच्छता !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील समविचारी हिंदूंनी एकत्र येऊन साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात साकडे घातले.

उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून सांगितलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये

श्री. जयतीर्थ आचार्या हे उडुपी, कर्नाटक येथील ज्योतिषी आहेत. ‘राघवेंद्र स्वामी उडुपी मठा’चे ते व्यवस्थापक आहेत. वर्ष १९९६ पासून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते ज्योतिष विषयाचा अभ्यास करत आहेत. ९.४.२०२३ या दिवशी श्री. जयतीर्थ यांची मी भेट घेतली.

अध्यात्माच्या संदर्भातील लिखाण किंवा लेख असणारी नियतकालिके असल्यास ती कृपया सनातनला पाठवा !

सनातनने आतापर्यंत गुरुकृपायोगाच्या अंतर्गत विविध साधनामार्गांची ओळख करून देणारे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. आगामी काळात अध्यात्म आणि विविध साधनामार्ग यांची अधिक सविस्तर माहिती जिज्ञासूंना देता यावी, यासाठी त्या संदर्भातील लिखाणाचे संकलन करणे चालू आहे. यासंदर्भात लेख असणारे दैनिक, पाक्षिक, मासिक यांसारखी नियतकालिके कुणाकडे असल्यास त्यांनी ती पुढील पत्त्यावर पाठवावी.

हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या अनेक संस्थांची आवश्यकता ! – पू. कृष्णात डोणे महाराज (वाघापुरे महाराज)

तुम्ही जे हिंदु राष्ट्राचे कार्य करत आहात, ती काळाची आवश्यकता असून त्याला यश प्राप्त होईल. हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्‍या सनातन संस्थेसारख्या अनेक संस्थांची आवश्यकता असून यापुढील काळात हे कार्य वृद्धींगत होईल.