पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर कराव्यात !

सनातन संस्था गेली २५ वर्षे अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. या कालावधीत साधक, वाचक, हितचिंतक यांचा परस्पर परिचय होऊन ते अध्यात्म अन् साधना यांसह वैयक्तिक स्तरावर काही व्यवहार करत असल्यासे निदर्शनास आले आहे…

कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !

धर्मप्रसाराच्या सेवेसाठी १५.१२.२०२४ पासून ५.३.२०२५ या काळात कुंभक्षेत्री विविध सेवांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता आहे. ‘डिझेल’वर चालणारी आणि ४ – ५, तसेच ८ – १० व्यक्ती बसू शकतील, एवढ्या आसनक्षमतेची चारचाकी वाहने आणि शक्यतो ‘सेल्फ स्टार्ट’ असलेली दुचाकी वाहने आवश्यक आहेत.

लक्ष्मीपूजन कधी आणि कोणत्या दिवशी करावे ?

यंदाच्या वर्षी ‘लक्ष्मीपूजन कधी करावे ?’, याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात जे निर्णय सांगितले आहेत, त्यानुसार लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी करावे ? हे येथे देत आहोत.

धनत्रयोदशी निमित्त धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

‘२९.१०.२०२४ या दिवशी ‘धनत्रयोदशी’ आहे. ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी ! या दिवशी मनुष्याचे सुरळीतपणे पोषण होण्यासाठी साहाय्य करणार्‍या धनाची (संपत्तीची) पूजा केली जाते. व्यापारी लोकांच्या दृष्टीने धनत्रयोदशीपासून नववर्षाला आरंभ होत असल्याने ते या दिवशी तिजोरीचे पूजन करतात. सत्कार्याला धन अर्पण करणे, हीच लक्ष्मीची खरी पूजा होय.

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून सनातनने प्रसिद्ध केलेले ‘बालसंस्कार’ या ग्रंथमालिकेतील, तसेच अन्य ग्रंथ दिल्यास त्यांच्या मनावर सुसंस्कारांचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य होईल. ‘व्यावहारिक जीवनात यशस्वी बनण्यासह गुणी अन् आदर्श होण्यासाठी काय करावे ?’, याविषयीची अमूल्य माहिती या ग्रंथांत दिली आहे.

सनातन संस्थेच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवात विविध माध्यमांतून उत्तरप्रदेश आणि बिहार येथे करण्यात आला धर्मप्रसार !

नुकत्याच पार पडलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या कालावधीत उत्तरप्रदेशातील कानपूर, अयोध्या, भदोही, तसेच बिहार राज्यातील समस्तीपूर आणि गया येथे सनातन संस्थेने प्रवचनांचे आयोजन केले. या प्रवचनांमधून देवी पूजनाशी संबंधित शास्त्रीय माहिती देण्यात आली.

हिंदु धर्मावर होणारे विविध आघात रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची ! – सदगुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदूंच्या समस्यांविषयी सातत्याने हिंदु समाजामध्ये जागृती घडवून आणून त्याचा हिंदूंनी संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

पुणे येथे नवरात्री निमित्त सनातन संस्थेच्या वतीने आयोजित उपक्रमांना देवी-भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

शारदीय नवरात्री निमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील ‘चतुःशृंगी’ या स्वयंभू जागृत शक्तीस्थानाच्या ठिकाणी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते….

माधवनगर (सांगली) येथील सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन !

या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता माईणकर, सौ. सुलभा तांबडे, सौ. मंजिरी खानझोडे, सौ. पूनम ढमाले आदी उपस्थित होत्या.

प्रयागराज येथे होणार्‍या कुंभपर्वासाठी तेथील स्वतःची वास्तू उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात सहभागी व्हा !

जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराच्या सेवांकरता प्रयागमधील स्वतःची वास्तू विनामूल्य वापरण्यासाठी अथवा अल्प भाडे तत्त्वावर देऊ शकतात, त्यांनी कृपया कळवावे.