सनातन संस्था आयोजित बिंदूदाबन शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला लाभ !

आगामी भीषण आपत्काळात रुग्णांना होणार्‍या वेदना न्यून होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन-उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.

पुणे येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन !

विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी प्रथम सत्र परीक्षेच्या ‘ओपन डे’च्या निमित्ताने पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. जयश्री काळे यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित धर्मश्री प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सवी सन्मान सोहळा

दिनांक : शनिवार, ३० नोव्हेंबर २०२४, सायंकाळी ५ वाजता

स्थळ : सुकुर पंचायत हॉल, पर्वरी, बार्देश, गोवा.

गोव्यात ३० नोव्हेंबरला सनातन संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा !

प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांचा गाेव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते अमृतमहोत्सवी सन्मान होणार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असलेल्या मंगळुरू येथील सनातनच्या १३१ व्या संत पू. (सौ.) शशिकला किणी (वय ७७ वर्षे) !

अक्कांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञताभाव आहे. दिवसभरातील प्रत्येक कृती झाल्यावर त्या प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. यातून ‘मला पुष्कळ आनंद मिळतो’, असे त्या सांगतात. ‘गुरुदेवांनी माझा हात पकडून मला येथपर्यंत आणले’, या विचाराने प.पू. गुरुदेवांप्रती त्यांचा कृतज्ञताभाव दाटून येतो.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असा भाव असणार्‍या सनातनच्या १३० व्या संत उजिरे, कर्नाटक येथील पू. (श्रीमती) कमलम्मा (वय ८१ वर्षे) !

कमलम्मा यांच्या मनात ‘साधनेमुळे स्वतःला जसा लाभ झाला आहे, तसा लाभ सर्वांना व्हायला पाहिजे’, अशी तळमळ आहे. त्यामुळे भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्या साधना करायला सांगतात. आतापर्यंत त्यांनी ‘वर्गणीदार बनवणे, ग्रंथप्रदर्शन कक्ष लावणे आणि प्रसारसेवा करणे’, अशा सेवा केल्या आहेत.

सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती भाव असलेले पुत्तुर, कर्नाटक येथील सनातनचे १२९ वे संत पू. सांतप्पा गौडा (वय ८१ वर्षे) !

पुत्तुर येथील साधकांना काही अडचण आली, तर ते मामांचे मार्गदर्शन घेतात. मामा त्यांना भावाच्या स्तरावर मार्गदर्शन करतात. श्री. सांतप्पामामा म्हणजे पुत्तुर येथील साधकांचा आधारस्तंभच आहेत. ‘साधकांना साहाय्य करणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे’, असे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत.

अर्बन (शहरी) नक्षलवादापासून सावध राहून धर्माचे रक्षण करावे ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु धर्म नष्ट करण्यासाठी ‘अर्बन नक्षलवाद्यांचे’ मोठे षड्यंत्र चालू आहे. हे अर्बन नक्षलवादी शिक्षण, प्रशासन, साहित्य, प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून हिंदु धर्म नष्ट करू पहात आहेत.

कर्नाटकातील श्री. सांतप्‍पा गौडा (वय ८१ वर्षे), श्रीमती कमलम्‍मा (वय ८१ वर्षे) आणि सौ. शशिकला किणी (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !

‘कर्नाटकच्‍या साधकांचे अहोभाग्‍य आहे की, एकाच दिवशी ईश्‍वराने ३ संतरत्नांच्‍या रूपात त्‍यांना अनमोल भेट दिली आहे. ‘दक्षिण कन्‍नड’ या जिल्‍ह्यातील ३ साधकांनी एकाच दिवशी संतपद प्राप्‍त करणे’, ही सनातनच्‍या इतिहासातील एक अपूर्व घटना आहे.

धरुहेडा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या सौ. तृप्ती जोशी यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.