खेड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ उत्साहात पार पडले !
रुग्णांच्या वेदना न्यून करता येण्यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचारपद्धत वापरता यावी यासाठी खेड येथे ५ ते ७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ३ दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनचे साधक आणि निसर्गोपचारतज्ञ डॉ. दीपक जोशी यांनी उपस्थित शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.