आध्‍यात्मिक त्रासाच्‍या निवारणासाठी उपयुक्‍त ‘शून्‍य’, ‘महाशून्‍य’ आणि ‘निर्गुण’ हे नामजप ऐका !

‘कुठलीही गोष्‍ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्‍याच्‍या काळानुसार कुठल्‍या प्रकारचा नामजप करायचा’, याचा अध्‍यात्‍मशास्‍त्रदृष्‍ट्या अभ्‍यास करून विविध नामजप महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत विभागाने परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍या मार्गदर्शनाखाली ध्‍वनीमुद्रित केले आहेत.

‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपामुळे निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे

कुलदेवतेच्या सगुण उपासनेच्या नामजपापासून गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील शेवटच्या ‘निर्विचार’ या निर्गुण स्थितीला घेऊन जाणार्‍या नामजपापर्यंत साधकांचा साधनाप्रवास करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत अनंत कृतज्ञता !

देवतेच्या ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजपाचे महत्त्व

कोणतीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘काळानुसार सध्या देवतांचे तारक आणि मारक तत्त्व कोणत्या प्रकारच्या नामजपांतून अधिक मिळू शकते’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून देवतांचे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत.

प्रतिदिन दुर्गा सप्तशती पोथीतील देवीकवच म्हणा !

आपत्कालात देहाचे रक्षण होण्यासाठी, तसेच अनेक व्याधींपासून (हाडेदुखी, स्नायूदुखी, अनेक दुर्धर आजार, रक्तव्याधी) मुक्त होण्यासाठी साधकांनी प्रतिदिन दुर्गा सप्तशतीमधील चण्डिकवच (देवीकवच) म्हणणे आवश्यक आहे.

आदित्यहृदय स्तोत्र

आदित्यहृदय स्तोत्र लावून या स्तोत्रातील चैतन्यामुळे स्वत:च्या हृदयाच्या भोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी सूर्यदेवाला प्रार्थना करून हे स्तोत्र सलग ३ वेळा ऐकावे…

शनिस्तोत्र

कोणस्थ, पिंगल, बभ्रु, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरि, शनैश्चर आणि मंद या दहा नावांनी पिप्पलादऋषींनी शनिदेवाची स्तुती केली. ही दहा नावे सकाळी उठल्यावर जो म्हणील, त्याला कधीही शनिग्रहाची बाधा होणार नाही.

मारुतिस्तोत्र

समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेल्या मारुतिस्तोत्रात ते विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्याची स्तुती करतात.