सनातन संस्था आयोजित बालक-पालक मेळावा पार पडला !

येथील शाहूपुरी, खिंडवाडी आणि क्षेत्र माऊली या ठिकाणी सनातन संस्थेने बालक-पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला बालक आणि पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्याचा लाभ ७७ बालक आणि २० पालक यांनी घेतला.

सनातन संस्था आयोजित बालसंस्कार वर्गामुळे मुलांमध्ये सकारात्मक परिवर्तन ! – पालकांचे मनोगत

सनातन संस्थेने जैसलमेर आणि सोजत येथे बालसंस्कार वर्गातील मुले अन् त्यांचे पालक यांच्यासाठी ‘बालक-पालक परिचय सोहळ्या’चे आयोजन केले…

महाकुंभक्षेत्री आग लागलेल्या घटनास्थळी सनातन संस्थेच्या साधकांचे प्रशासनास साहाय्य !

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सनातन संस्थेच्या साधकांनी तात्काळ आग लागलेल्या ठिकाणी जाऊन तेथील अग्नीशमन दल, पोलीस, एन्.डी.आर्.एफ् आणि प्रशासकीय कर्मचारी यांना साहाय्य केले.

सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार’ शिबिराचे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन !

या शिबिरात मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, पोटाचे विकार, आम्ल-पित्त, महिलांचे मासिक पाळीशी संबंधित आजार असे विविध आजार असणार्‍या ५० रुग्णांवर वैद्य दीपक जोशी यांनी उपचार केले.

अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !

मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, पोटाचे विकार असे विविध आजार असणार्‍या ४० रुग्णांवर डॉ. दीपक जोशी यांनी उपचार केले. उपचारानंतर रुग्णांनी ‘बरे वाटले’, असे सांगितले.

सनातन संस्था आयोजित बिंदूदाबन शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला लाभ !

आगामी भीषण आपत्काळात रुग्णांना होणार्‍या वेदना न्यून होण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन-उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.

पुणे येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन !

विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी प्रथम सत्र परीक्षेच्या ‘ओपन डे’च्या निमित्ताने पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. जयश्री काळे यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

धरुहेडा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या सौ. तृप्ती जोशी यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.

सनातन संस्थेच्या वतीने मथुरा (उत्तरप्रदेश) येथील ‘राधा माधव इंटर कॉलेज’मध्ये ‘तणाव निर्मूलन’ विषयावर व्याख्यान पार पडले !

सनातन संस्थेच्या वतीने येथील ‘राधा माधव इंटर कॉलेज’मध्ये शिक्षकांसाठी ‘तणाव निर्मूलन’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या मार्गदर्शनाचा महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. कैलाश पचौरी यांच्यासह अनेक शिक्षकांनी लाभ घेतला.

नामस्मरणाने विद्यार्थ्यांचा तणाव न्यून होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते !- सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था

सध्या विद्यार्थ्यांसाठी तणाव ही विशेष समस्या झाली आहे.