देहली येथील ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’त सनातन संस्‍थेचा सहभाग

देहली येथील भारत मंडपम् येथे ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’चे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या पुस्तक मेळ्याचे उद्घाटन राष्ट्‍रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.

इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रे’मध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या वतीने अध्‍यात्‍मप्रसार

इंदूर (मध्‍यप्रदेश) – येथील दसरा मैदानावर ‘तरुण जत्रे’चे (‘फूड फेस्‍टिव्‍हल’चे) आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, धर्मजागृती आणि राष्ट्‍ररक्षण या विषयांवरील ग्रंथ प्रदर्शन, तसेच हिंदु धर्म संस्कृतीविषयी वैज्ञानिक माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.

हिंदूंनी नामजप आणि धर्मपालन केल्यास लाभ निश्चित ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

कलियुगात प्रत्येक जण आनंद मिळवण्यासाठी धडपडतो; मात्र आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विविध त्रासांना सामोरे जावे लागते. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे आणि आपल्या कुलदेवीचा नामजप केल्यास प्रारब्ध सुसह्य होण्यास साहाय्य होते….

आनंदी जीवनासाठी साधनेविना तरणोपाय नाही ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, सनातन संस्‍था

सध्‍या मनुष्‍याचे जीवन तणावपूर्ण आणि धावपळीचे झाले आहे. तणावमुक्‍त आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर साधनेविना तरणोपाय नाही, असे मार्गदर्शन सनातनच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी केले.

मनसे आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शनात सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन !

ग्रंथप्रदर्शनांना भेट देणारे विविध मान्यवर जिज्ञासू सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळाविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथांचा लाभ घेत आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनांना मान्यवरांनी दिल्या भेटी !

घाटकोपर असल्फा येथील श्री जंगलेश्वर मंदिर येथे लावलेल्या कक्षाला चांदिवली मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार श्री. दिलीप लांडे यांनी भेट दिली.

रायगड जिल्ह्यांतील सहस्रो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना भेट !

प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

सनातन संस्थेचे धर्मरक्षणाचे कार्य छान आहे. आज खरी आवश्यकता धर्मरक्षणाची आहे आणि संस्था तेच कार्य करत आहे. संस्थेच्या कार्याला पुष्कळ शुभेच्छा- गृहराज्यंमत्री योगेश कदम

महाशिवरात्रीनिमित्त पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथे ४५ हून अधिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शने !

पुणे शहरात २२ ठिकाणी, तर पिंपरी-चिंचवड येथे २५ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सोलापूर येथे सनातन संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन !

बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर येथील ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध डॉ. अतुल वेलणकर आणि डॉ. अबोली वेलणकर यांच्या हस्ते कऱण्यात आले. या प्रदर्शनाला भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली,..