आनंदी जीवनासाठी साधनेविना तरणोपाय नाही ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, सनातन संस्‍था

सध्‍या मनुष्‍याचे जीवन तणावपूर्ण आणि धावपळीचे झाले आहे. तणावमुक्‍त आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर साधनेविना तरणोपाय नाही, असे मार्गदर्शन सनातनच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी केले.

आनंदप्राप्तीसाठी धर्माचरण आवश्यक ! – सद्गुरु अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार करणे अत्यंत आवश्यक असून या संस्कारांमुळे केवळ त्यांनाच नव्हे, तर पुढे त्यांच्या कुटुंबियांनाही चिरंतन आनंद मिळेल. शाळेतील शिक्षणामुळे एकवेळ पैसा कमवण्याचा मार्ग मिळेल; पण धर्माचरण आणि योग्य संस्कार यांमुळे त्यांच्या भावी आयुष्याचा पाया पक्का होईल….

नवी मुंबईतील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी !

सीवूड (नेरूळ) येथे ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई आणि क्रेडाई बी.ए.एन्.एम्. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने २३ वे मालमत्ता प्रदर्शन २४ ते २७ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

धर्माचे शिक्षण न दिल्यामुळेच हिंदु युवती धर्मांधांच्या वासनांना बळी पडत आहेत ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदूंच्या महिला आणि युवती यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करून जीवन उद्ध्वस्त केले जात आहे. हे एक हिंदूंचा वंश संपवण्याचे षड्यंत्र असून धर्माचे शिक्षण न दिल्यामुळेच हिंदु युवती धर्मांधांच्या वासनांना बळी पडत आहेत, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

शास्त्र समजून गंगास्नान करणे आवश्यक ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

शास्त्र धर्मप्रचार सभा’ या संघटनेने आयोजित केलेल्या माघ-मेळा वार्षिक अधिवेशनात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ‘गंगानदीचे माहात्म्य आणि गंगा नदीत स्नान कसे करावे ?’, याविषयी मार्गदर्शन केले.

वर्धा येथे सनातन संस्‍थेकडून भागवत कथाकार पू. श्री गंगोत्री तिवारी महाराज यांचा सन्‍मान !

महादेवपुरा येथील शिवमंदिरामध्‍ये मुझफ्‍फरपूर (उत्तरप्रदेश) येथील भागवत कथाकार पू. श्री गंगोत्री तिवारी महाराज यांच्‍या भागवत कथेचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यानिमित्ताने सनातनच्‍या साधकांनी त्‍यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

सनातन संस्था आयोजित बालक-पालक मेळावा पार पडला !

येथील शाहूपुरी, खिंडवाडी आणि क्षेत्र माऊली या ठिकाणी सनातन संस्थेने बालक-पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला बालक आणि पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्याचा लाभ ७७ बालक आणि २० पालक यांनी घेतला.

श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने हरियाणामध्ये कार्यक्रमांचे आयोजन

अयोध्येत श्री रामलल्लाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने हरियाणातील फरिदाबाद आणि धारुहेरा (रेवाडी) येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सनातन संस्थेच्या सरोज गुप्ता आणि सौ. स्वाती सातपुते यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला.

सनातन संस्था आयोजित बालसंस्कार वर्गामुळे मुलांमध्ये सकारात्मक परिवर्तन ! – पालकांचे मनोगत

सनातन संस्थेने जैसलमेर आणि सोजत येथे बालसंस्कार वर्गातील मुले अन् त्यांचे पालक यांच्यासाठी ‘बालक-पालक परिचय सोहळ्या’चे आयोजन केले…

नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन !

‘क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.’च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेने सनातन-निर्मित ग्रंथांचे प्रदर्शन लावले होते. २४ ते २७ जानेवारी या कालावधीमध्ये सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सीवूड्स, पाम बीच रस्ता,…