‘घडा’ या पारंपरिक गरबा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम

नवरात्रीमध्ये देवीतत्त्व नेहमीपेक्षा एक सहस्र पटींनी कार्यरत असते. गरबा खेळणे, म्हणजे टाळ्यांच्या नादात्मक सगुण उपासनेतून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे होय. ‘घडा’ या पारंपरिक नृत्याचा होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.

पारंपरिक गरबा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम

‘नृत्य करणा-या व्यक्तीवर गरबा नृत्याचा आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.

कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?

नवरात्रोत्सवात देवीच्या देवळात जाऊन देवीची ओटी भरणे शक्य नसल्यास घरीच देवघरातील कुलदेवीची ओटी भरावी.

शक्तीस्वरूप आणि वात्सल्यमूर्ती देवीचे विविध प्रकार, तसेच नवरात्रीत देवीने धारण केलेली नऊ रूपे अन् त्यांची कार्यानुरूप वैशिष्ट्ये !

देवी या ईश्‍वराच्या वात्सल्यरूपाचे साकार रूप असतात, तसेच त्या देवतांच्या निर्गुण शक्तीचे सगुण स्वरूप असतात.

शुंभ आणि निशुंभ या अजेय असुरांशी युद्ध करून त्यांचा नाश करणारी आणि त्रैलोकात शांती प्रस्थापित करणारी पार्वतीसुता कौशिकीदेवी !

नवरात्रीच्या काळात भारतातील विविध प्रसिद्ध अन् प्राचीन देवी मंदिरांचा इतिहास, त्यांचे महत्त्व, छायाचित्रे, तसेच नवरात्रोत्सवामागील अध्यात्मशास्त्र इत्यादी माहिती या सदरातून आपण जाणून घेणार आहोत

नवरात्र : बाजारीकरण आणि संभाव्य धोके !

हिंदूंच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे, त्या अनुषंगाने अन् पौरोहित्य करतांना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत, त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतो.

देवीचे माहात्म्य !

देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले, तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे. उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतीवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो.

नवरात्र

नवरात्र हे देवीचे व्रत असून महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हे व्रत कुलाचार म्हणूनसुद्धा पाळले जाते. नऊ दिवस व्रतस्थ राहून देवीची आराधना केली जाते.