महाकुंभ मेळा २०२५ येथील हिंदु राष्ट्र पदयात्रेत सनातन संस्था सहभागी !

या पदयात्रेत हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्त्रोत आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ तथा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या विशेष रथात विराजमान होत्या.

कुंभमेळ्यात सनातन संस्था आयोजित ‘सनातन संस्कृति प्रदर्शन’ याचे उद्घाटन !

सनातन धर्म, संस्कृति आणि परंपरांचा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक आधार समजावून देणारे ‘सनातन संस्कृति प्रदर्शन’ प्रयागराज येथील कुंभमेळ्यात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १२ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सनातन संस्था शिबीर, सेक्टर ९, गंगेश्वर महादेव मार्ग, प्रयागराज येथे सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत खुले राहील.

प्रयागराज महाकुंभ मेळा २०२५ येथे सनातन संस्थेच्या धर्मशिक्षा प्रदर्शनाचे महामंडलेश्‍वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते उद्घाटन !

‘सनातन धर्मशिक्षा, राष्ट्र आणि धर्म’ प्रदर्शनातून अध्यात्मप्रसार करणे, हे महत्त्वपूर्ण आणि मोठे धर्मकार्य ! – महामंडलेश्‍वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज

इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘जैविक महोत्सवा’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

इंदूर येथील ‘जैविक महोत्सव’ मेळ्यामध्ये सनातन संस्थेने आध्यात्मिक ग्रंथांसह आयुर्वेद, देवता, बालसंस्कार, सण-उत्सव, कर्मयोग, बिंदुदाबन, आगामी भीषण आपत्काळातील सुरक्षेची सिद्धता, आचारधर्म, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती विषयांवर आधारित ग्रंथ प्रदर्शन लावले होते.

हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्मशिक्षित व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

काही लोकप्रतिनिधी हिंदु धर्माला संपवण्याची भाषा करत आहेत, तर काही लोकप्रतिनिधी हिंदु धर्माचा अवमान करत आहेत. सनातन धर्म हा चिरंतन आहे. तो कधीही नष्ट होणारा नाही, याला इतिहास साक्षी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्यामुळे पाश्चात्त्यांच्या विकृतीला ते कवटाळत आहेत…

सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथ प्रदर्शनाला प्रसिद्ध आचारी विष्‍णु मनोहर यांची सदिच्‍छा भेट !

चंपाषष्‍ठीच्‍या निमित्ताने नागपूरच्‍या कॉटन मार्केट येथील खंडोबा मंदिरात सनातन संस्‍थेच्‍या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक वस्‍तूंचे प्रदर्शन लावण्‍यात आले होते.

सनातन संस्थेचे साधक यांनी घेतल्या ‘संत समावेश’ कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या भेटी !

कणेरी मठ (कोल्हापूर) येथे संत-महंत, धर्माचार्य यांच्या उपस्थितीत होत असलेला ‘संत समावेश’ कार्यक्रम !

हिंदु धर्मावर होणारे विविध आघात रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची ! – सदगुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदूंच्या समस्यांविषयी सातत्याने हिंदु समाजामध्ये जागृती घडवून आणून त्याचा हिंदूंनी संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

पुणे, मिरज येथे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या शोभायात्रेत सनातन संस्था सहभागी !

‘जय श्रीरामा’च्या जयघोषात आणि ढोल- ताशांच्या गजरात शहरात ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साही वातावरणात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी उत्साही वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

चला, रामराज्याच्या दिशेने वाटचाल करूया !

श्रीरामजन्मभूमीवर 490 वर्षांच्या वनवासानंतर भव्य श्रीराममंदिर उभे रहात आहे. संपूर्ण देशातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंमध्ये उत्साहाचा संचार झाला आहे. अमेरिकेमध्ये हिंदूंकडून श्रीराममंदिरानिमित्त फेर्‍या काढण्यात येत आहेत. संपूर्ण भारत राममय झाला आहे. 22 जानेवारी जशी जवळ येत आहे, तशी भारतियांमध्ये रामभक्तीची ज्योत अधिक तेजस्वीपणे तेवू लागत आहे