कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती’ आणि ‘सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती’ यांच्या तुलनेत ‘सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती’ उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक असल्याचे स्पष्ट

‘सर्व संप्रदायांना पूज्य आणि संतांनी गौरवलेले दैवत, म्हणजे श्री गणेश ! प्रत्येक संप्रदायात गणेशपूजा आहे. अनेकांच्या नित्य पूजनातही गणेशमूर्ती असते. श्री गणेशाची मूर्ती सात्त्विक असेल, तरच उपासकाला गणेशतत्त्वाचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो.

‘R.F.I. रीडींग’ उपकरण व ‘PIP’ तंत्रज्ञान यांद्वारे सिद्ध झालेले सात्त्विक गणेशमूर्तीचे श्रेष्ठत्व !

एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत किंवा ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते.