‘श्री राजमातंगी यज्ञा’चा यज्ञातील अन्य घटकांच्या तुलनेत श्री राजमातंगीदेवीचे चित्र आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यज्ञाच्या वेळी परिधान केलेली पोपटी रंगाची साडी यांवर अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होणे

‘श्री राजमातंगी यज्ञाचा यज्ञातील घटकांवर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील प्रसिद्ध श्री हालसिद्धनाथ यात्रा आणि भाकणूक यांचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैज्ञानिक संशोधन !

‘बेळगाव जिल्ह्यात कोल्हापूरपासून जवळच श्री हालसिद्धनाथांचे एक अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान आहे, ते म्हणजे श्री क्षेत्र आप्पाचीवाडी आणि कुर्ली. दिसायला ही गावे दोन असली, तरी त्या दोन्ही गावांना श्री हालसिद्धनाथांवरील श्रद्धेने आणि प्रेमाने घट्ट बांधले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धन्वंतरि देवाला प्रार्थना करून औषधी वनस्पतींना केवळ एक मिनिट हस्तस्पर्श केल्यावर त्या वनस्पतींवर झालेला सकारात्मक परिणाम

औषधी वनस्पतींमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आयुर्वेदात त्यांचा उपयोग विविध विकार बरे करण्यासाठी केला जातो. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या लागवड परिसरात नरक्या, शतावरी, गवती चहा, आवळा, वाळा, बेल, चंदन आदी औषधी वनस्पतींचे रोपण करण्यात आले आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील चैतन्यामुळे तेथील माती आणि कृष्णा नदीचे पाणी यांच्यामध्येही चैतन्य असणे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘दत्ताची सर्वच तीर्थक्षेत्रे अत्यंत जागृत आहेत. या तीर्थक्षेत्री गेल्यावर तेथील चैतन्याची अनुभूती भक्तांना येते. श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी) हे महाराष्ट्रातील अत्यंत जागृत दत्तक्षेत्र आहे. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती तेथे १२ वर्षे राहिले. तेथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम आहे. सध्याच्या कलियुगात अनेक … Read more

‘श्रीमद्भगवद्गीता’ या धर्मग्रंथाचे पठण केल्यावर तीव्र आध्यात्मिक त्रास असणारी साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसणारा साधक यांच्यावर झालेला सकारात्मक परिणाम

श्रीमद्भगवद्गीतेमुळे ‘जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये’, याचे ज्ञान होते. ती वाट चुकलेल्यांना मार्गदर्शन करते आणि दुःखी-कष्टी लोकांना आश्‍वस्त करते.

प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्य स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी !

संतांच्या पादुकांमध्ये चैतन्य असते. हे चैतन्य भावपूर्ण उपासनेने टिकून रहाते अन् वृद्धिंगत होते. अशाप्रकारे संतांच्या देहत्यागानंतर ते स्थूलदेहाने प्रत्यक्षात नसतांनाही त्यांच्या पादुकांच्या माध्यमातून संतांमधील चैतन्याचा लाभ भाविकांना होत असतो. त्यामुळे हिंदु संस्कृतीत गुरूंच्या आणि संतांच्या पादुकांचे पूजन करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे.

फ्रान्सिसकस् यांनी गिटारवर इंग्रजी पॉप गीताची धून वाजवल्यावर साधक-श्रोते, वादक, वाद्य (गिटार), तसेच पक्षी आणि प्राणी यांवर नकारात्मक परिणाम होणे; पण त्यांनी संतांच्या भजनाची धून वाजवल्यावर त्या सर्वांवर सकारात्मक परिणाम होणे

रतीय शास्त्रीय संगीताला आध्यात्मिक पाया असल्याने सत्त्वगुणी भजनाची धून वाजवल्यावर त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने त्यांचा चाचणीतील घटकांवर सकारात्मक परिणाम होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.

बॉम्बे, औरंगाबाद यांसारखी परकियांची असात्विक नावे पालटून मुंबई, संभाजीनगर यांसारखी भाषा, राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान जपणारी नावे नगरांना देण्याची आवश्यकता स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी

प्राचीन काळी नगरांची (शहरांची) नावे तेथील ग्रामदेवता, पराक्रमी राजे आदींच्या नावांवर आधारित होती. त्यामुळे नगरांची नावे सात्त्विक होती. जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतशी भारतावर परकियांची आक्रमणे होऊ लागली. तेथील काही भूभागांवर इस्लामी राजवटीस आरंभ झाला.

धन्वंतरि यागातून निर्माण झालेल्या चैतन्यामुळे यज्ञकुंड, पूजेची मांडणी, जळू, धन्वंतरि देवाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘धन्वंतरि यागाचा यज्ञकुंड, पूजेची मांडणी, जळू, धन्वंतरि देवाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या दिवशी यज्ञस्थळी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा, आश्रमातील भिंती आणि साधकांचे शरीर यांवर वाईट शक्तींचे तोंडवळे आणि दैवी आकृत्या दिसणे

‘प्राचीन काळी ऋषि-मुनी यज्ञयागादी विधी करत. त्या वेळी राक्षस त्यांत विघ्ने आणत. ते ऋषि-मुनींना जिवे मारत आणि गायींना मारून खात. हा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. प्रत्येक युगात देवासुर लढा निरंतर चालू असतो. कलियुगांतर्गत कलियुगातही तो चालू आहे.