महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने भगवान शिवाच्या उपासनेत रुद्राध्याय पठण करण्याचे महत्त्व दर्शवणारी केलेली वैज्ञानिक चाचणी !
महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध श्री रामलिंग देवस्थानातील शिवलिंगाच्या पूजनाच्या वेळी रुद्राध्यायाच्या पठणापूर्वी आणि रुद्राध्यायाच्या पठणानंतर शिवलिंगातून प्रक्षेपित होणार्या ऊर्जेचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यात आला. त्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.