गॅस किंवा विजेचा उपयोग करून शिजवलेल्या अन्नापेक्षा मातीच्या चुलीवर शिजवलेल्या अन्नातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे !
विजेच्या शेगडीवर शिजवलेला भात, गॅसच्या शेगडीवर शिजवलेला भात आणि मातीच्या चुलीवर शिजवलेला भात यांच्यामधून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास कण्यासाठी ४.९.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.