देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! – भाग १
देवरुख येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जाहीर प्रवचन होते. या कार्यक्रमात परात्पर गुरु डॉक्टरांना टिळा लावण्याची सेवा माझ्याकडे होती. त्या वेळी मला त्यांचे जवळून दर्शन झाले. त्या वेळची माझी स्थिती मला आठवत नाही; परंतु माझ्या मनाला आनंद मिळाला.