पू. (सौ.) अश्विनी पवार या छायाचित्रात इतरांपेक्षा पुष्कळ उठून आणि तेजस्वी दिसत असण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !
प.पू. डॉक्टरांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला सेवेनिमित्त पू. ताईचा सहवास मिळत असतो. पू. ताईच्या सहवासात असतांना मला आध्यात्मिक त्रास होत असल्यास पू. ताईच्या चैतन्याने त्रास पुष्कळ लवकर उणावत असल्याचे बर्याचदा अनुभवायला मिळते.