सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास भाग – ३
वर्ष १९८९ मध्ये माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली. आरंभी त्यांना भेटतांना माझे वैयक्तिक प्रश्न सुटण्यावरच माझा भर होता; मात्र त्यांनी ‘सर्व प्रश्नांवर ‘साधना करणे’, हाच उपाय आहे’, हे माझ्या मनावर बिंबवले.