गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी कपिलेश्वरी (फोंडा) येथील पू. (सौ.) सुमन नाईक सनातनच्या संतांच्या मंदियाळीतील ६२ वे संतपुष्प !
सनातन आश्रम, रामनाथी (वार्ता.) – कठीण प्रसंगांतही ईश्वरावर असलेली दृढ श्रद्धा, श्रीगुरूंप्रती अपार कृतज्ञताभाव, साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी निरपेक्षतेने प्रयत्न करणे आदी अनेक गुणवैशिष्ट्यांनी संपन्न असलेल्या कपिलेश्वरी, फोंडा येथील साधिका सौ. सुमन नाईक (वय ६७ वर्षे) या सनातनच्या ६२ व्या समष्टी संत झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या रामनाथी आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या कार्यक्रमात सर्वांना मिळाली. सनातनच्या ३ साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याच्या वार्तेने श्रीकृष्णाकडून मिळालेल्या आनंदात आणखी वाढ झाली.