‘अनंत आनंदाचे डोही अनंत आनंद तरंग ।’ याची अनुभूती देणारा रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेला भावसोहळा !
सोहळ्याला उपस्थित सर्वांनीच ‘अनंत आनंदा’ची अनुभूती घेतली. सद्गुरु नंदकुमार जाधव आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे घोषित केल्यानंतर त्यांनी, तसेच त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले.