सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा साधनाप्रवास !

गुरुदर्शनानंतर अवघे जीवन गुरुचरणी समर्पित करणार्‍या आणि अंतरात कृष्णभक्तीच्या रसात रंगून जात असतांना साधकांनाही कृष्णानंदात डुंबवणार्‍या सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा साधनाप्रवास !

साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर व्हावा, यासाठी अहोरात्र झटणारे आणि साधकांना घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे पू. डॉ. मुकुल गाडगीळ !

साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी त्यांना नामजप, मुद्रा, न्यास शोधून देणे अशा स्वरूपाची सेवा पू. मुकुल गाडगीळकाका करतात.

भावपूर्ण गुणवर्णनातून शब्दबद्ध केलेल्या पू. (सौ.) अश्विनी पवार !

‘गुरुमाऊलीने पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या माध्यमातून आम्हाला संतरत्न उपलब्ध करून दिले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी आम्हा देवद आश्रमातील सर्व साधकांसाठी मिळालेली ही अमूल्य भेट आहे. अध्यात्माच्या वाटेवरून जातांना ‘आध्यात्मिक आई’चे बोट धरण्याची संधी आम्हाला लाभली. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे ! ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असा आम्हा सर्वांना पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा सर्वच स्तरांवर लाभ करून घेता येऊ दे.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या सन्मान सोहळ्यातील भावस्पर्शी क्षण !

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या सन्मान सोहळ्यातील भावस्पर्शी क्षण छायाचित्ररूपात प्रसिद्ध करत आहोत.

अंतर्मुखता, साधकांना घडवण्याची तीव्र तळमळ असणार्‍या, तसेच लहान वयात संतपद गाठून ‘मूर्ती लहान; पण कीर्ती महान’ ही म्हण सार्थ ठरवणार्‍या देवद येथील सनातन आश्रमातील पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

साधकांना साधनामार्गात मार्गदर्शन करणार्‍या, प्रत्येकाचे अंतर्मन जाणून त्याला साहाय्य करणार्‍या, प्रसंगी कठोर होऊन साधकांना घडवणार्‍या आणि साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची आंतरिक तळमळ असणार्‍या सौ. अश्‍विनी पवार यांनी ७१ टक्के पातळी गाठून संतपद प्राप्त केले !

साधकांना सेवा आणि साधना यांमध्ये साहाय्य करणारे प्रेममूर्ती सद्गुरु सत्यवान कदम !

‘सद्गुरु सत्यवानदादा स्वत:ची सेवा कोणालाही करायला देत नाहीत. पाणी भरणे इत्यादी स्वतःच्या सेवा ते स्वतःच करतात, तसेच इतर कोणत्याही कृती ते सहजतेने करतात.

साधकांवर प्रेमाची पखरण करणार्‍या सौ. अश्‍विनी पवार ६९ व्या संतपदी विराजमान !

आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी सौ. अश्‍विनी पवार हिने सनातनचे ६९ वे समष्टी संतपद प्राप्त करून सनातनच्या इतिहासात एक अनोखे पर्व निर्माण केले आहे. इतक्या लहान वयातही संत बनता येते, याचे अद्वितीय उदाहरण तिने सर्वांसमोर ठेवले आहे. साधनेत प्रगती होतांना काहीजण बाल्य, वानस्पत्य किंवा पैशाचिक अवस्थेतून पुढे वाटचाल करतात. बाल्यावस्थेतून संतपदापर्यंत कशी वाटचाल होते, हे सौ. अश्‍विनी हिच्या वाटचालीतून आम्हाला अभ्यासता आले. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरुदेवांना प्रत्यक्ष पाहिले नसतांनाही त्यांंच्यावर अपार श्रद्धा ठेवून ६८ वे संतपद गाठणार्‍या जळगाव येथील सौ. केवळबाई पाटीलआजी !

त्रेतायुगात शबरीने प्रभु श्रीरामाला प्रत्यक्ष पाहिले नसतांनाही सतत त्याचे स्मरण केले. त्या स्मरणामध्ये आर्तता आणि उत्कट भाव होता. त्यामुळे भगवंतालाही शबरीला भेटण्याची ओढ लागली आणि रामरायांनी तिला दर्शन दिले.

अल्प कालावधीत सर्वांशी जवळीक साधून सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील पू. (सौ.) सूरजकांता मेनरायकाकू !

पू. आई लहानपणी आम्हाला ग्रंथालयातून देशभक्त, क्रांतीवीर आणि भक्त यांची माहिती असणारी पुस्तके वाचण्यासाठी आणून द्यायची. प्रत्येक सुटीत आई-बाबा आम्हाला कोणत्या ना कोणत्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवून आणायचे.

कलियुगात परात्पर गुरु डॉक्टरांच्या रूपे साधकांना ईश्वर दर्शन होऊन त्यांचे चैतन्य अन् कृपा यांमुळे अखिल मानवजातीचे कल्याण होत आहे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

‘आम्ही साधनेला आरंभ करून एक वर्ष झाले असेल ! तेव्हा एका दिवाळी अंकात अंनिसने छापलेला सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या विरोधात लिहिलेला लेख वाचला.