वात्सल्यभाव, सेवाभाव आणि गुरूंप्रती अपार भाव असलेल्या सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

पू. उमाक्कांनी माझ्या मनातले ओळखून मला योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे परिस्थितीकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोनच पालटला. त्या दिवसापासून पू. उमाक्कांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या मनात साठवली जाते.

निरपेक्ष प्रीतीमुळे सतत इतरांचा विचार करणारे आणि प्रत्येक कृती सुंदर अन् आदर्श रितीने करणारे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी !

पू. संदीपदादांचे बोलणे अत्यंत शांत, नम्र आणि हळू आवाजात असल्याने ‘ते ऐकतच रहावे’, असे वाटते. पू. दादा करत असलेली प्रार्थना ‘ऐकतच रहावी’, असे वाटते.

शारीरिक त्रास असूनही वयाच्या ७८ व्या वर्षी तळमळीने सेवा करणारे सनातनचे २८ वे संत पू. सुदामराव शेंडे !

वृद्धावस्था आणि अनेक व्याधी असूनही पू. आजोबा कधी विश्रांती घेत नाहीत. कधी कधी ते रुग्णाईत असतात. तेव्हा त्यांना चक्कर येत असते, तसेच त्यांना उभे रहाणे आणि सेवेला जाणे अशक्य असते. तेव्हा ते खोलीत बसून सेवा करतात.

सेवाभावी आणि साधकांना बारकाव्यांसह सेवा शिकवणारे आध्यात्मिक पिता : ७२ वे संत पू. नीलेश सिंगबाळ !

पू. दादा नेहमी तत्त्वनिष्ठ राहून समोरच्याला चूक सांगतात. ते कुणालाही भावनिक स्तरावर हाताळत नाहीत. चूक सांगितल्यानंतर साधकांना दिशा मिळण्यासाठी मार्गदर्शन करून ते साधकांचा उत्साह वाढवतात.

वयोमानानुसार येणार्‍या शारीरिक अडचणींवर मात करून उत्तर महाराष्ट्रातील प्रसार कार्याची घडी बसवणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व : सनातनचे १३ वे सद्गुरु नंदकुमार जाधव !

सद्गुरु काका पहाटे ४.३० वाजता उठून रात्रीपर्यंत सेवा, समष्टी नामजप, साधकांना संपर्क इत्यादी करत असतात. कधीही ‘ते थकलेले आहेत’, असे दिसत नाही. 

गुरुदेवांप्रती उत्कट भाव असलेले छत्तीसगडचे पू. चत्तरसिंग इंगळे (वय ८७ वर्षे)

छत्तीसगड येथील राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी होणा-या व्ययाविषयी ते आम्हाला सातत्याने विचारणा करत होते. ते आम्हाला सांगत, ‘‘तुम्हाला काहीही न्यून पडल्यास मी पैसे देतो. अधिवेशनासाठी व्ययाचा विचार करू नका. देव आपल्याला देणार आहे.’’

सतत कृतज्ञताभावात रहाणार्‍या सोलापूर येथील पू. (श्रीमती) मंगळवेढेकरआजी (वय ७८ वर्षे) !

जे शिष्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, त्या शिष्यवत्सल गुरुमाऊलीच्या आणि शारीरिक स्थिती चांगली नसूनही गुरुसेवेची तळमळ असणा-या पू. (श्रीमती) मंगळवेढेकरआजींच्या चरणी अनंत कोटी दंडवत !

भोळा भाव, निर्मळ मन आणि प्रीतीचा सागर असलेल्या सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ८२ वर्षे) !

‘पू. आजींना कुणीही काहीही सांगितले, तरी त्या तत्परतेने आज्ञापालन करतात. त्या नेहमी इतरांच्या इच्छेप्रमाणे वागतात. त्यांना काही करायचे असेल, तर विचारून करतात. एखादी गोष्ट सांगितली, तर त्या सहजतेने स्वीकारतात.

अखंड शिकण्याच्या स्थितीत राहून परात्पर गुरुदेवांचे आज्ञापालन करणारे सद्गुरु सत्यवान कदम !

आमच्या घरात कुलाचाराचे पालन केले जायचे. गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, गणेशचतुर्थी आदी सण-उत्सव साजरे होत असत. वडील गावातील ‘आरेश्‍वर मंदिरा’त शंकराची पूजा करायचे.

मुलांना व्यावहारिक गोष्टींमध्ये न अडकवता त्यांना साधनेत प्रगती करण्याची प्रेरणा देणारे आणि उतारवयातही तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने सेवा करणारे सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप !

‘मनात केवळ साधनेचे विचार असावेत’, यासाठी बाबांनी वर्ष २०१५ मध्ये आमचे नाशिकचे घर आणि वर्ष २०१८ मध्ये त्यांची गावाकडील शेती विकली.