‘परात्पर गुरु डॉक्टरांचे आज्ञापालन’ असा भाव ठेवून सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी इंग्रजी भाषा शिकण्यासाठी केलेले प्रयत्न आणि इंग्रजी, गुजराती अन् हिंदी भाषा शिकल्याने प्रसारकार्य करतांना भाषेच्या दूर झालेल्या अडचणी !
फेब्रुवारी २००९ मध्ये मी कर्नाटक राज्यातून आंध्रप्रदेश राज्यात प्रसारासाठी जात असतांना मला इंग्रजी भाषा शिकून घेण्यास सांगण्यात आले. कर्नाटक येथील साधकांना, तसेच समाजातील लोकांना विशेष इंग्रजी येत नाही. ते कन्नड भाषेतूनच सर्व प्रसारसेवा करतात.