सोलापूर येथील सनातन संस्थेच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकर (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

सोलापूर येथे आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत साप्ताहिक सत्संग घ्यायच्या. वर्ष १९९६ पासून आम्ही सत्संगाला जाऊ लागलो. सत्संगात आम्हाला सनातन संस्थेची माहिती समजली आणि साधना करण्याविषयी मार्गदर्शन मिळाले

कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा सुरेख संगम असलेले बेळगाव येथील डॉ. नीलकंठ दीक्षित (वय ९० वर्षे) सनातनच्या ८७ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

बेळगाव (कर्नाटक) येथे २५.४.२०१९ या दिवशी झालेल्या सत्संगसोहळ्यात डॉ. नीलकंठअमृत दीक्षित हे सनातनचे ८७ वे संत झाल्याचे घोषित करण्यात आले.

प्रेमभाव आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अनन्य भाव हे गुण असलेल्या पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) !

श्रीमती शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) मागील २७ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. सध्या त्या त्यांची कन्या सौ. मेधा विलास जोशी यांच्यासह नंदनगद्दा, कारवार, कर्नाटक येथे रहातात.

अंतरीच्या भावदृष्टीने परात्पर गुरु डॉक्टरांना जाणणार्‍या आणि जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केवळ गुरुदेवांनाच अनुभवणार्‍या पू. (सौ.) संगीता पाटील !

बालपणीच त्यांचे मातृ-पितृ छत्र हरपल्याने भगवंतच त्यांचा माता-पिता आणि सखा बनला आहे. भगवंतच त्यांचे सर्वस्व असून त्या केवळ भगवंताच्या प्रेमामुळे, भगवंतावरील भक्तीमुळे आणि भगवंतावर असलेल्या अतूट निष्ठेमुळे जीवनातील दुःखद प्रसंगांना सामोरे जाऊ शकल्या.

दृष्टीहीन असूनही भोळ्या भावाच्या आधारे पू. (सौ.) संगीता पाटील झाल्या सनातनच्या ८५ व्या संत !

भोसरी (पुणे) येथे ३० मार्च या दिवशी झालेल्या भावसोहळ्यात भोसरी येथील सौ. संगीता पाटील (वय ५९ वर्षे) या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान झाल्या.

परिपूर्णता आणि तळमळ यांचा आदर्श असलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ !

सद्गुरु बिंदाताई विविध स्तरांवर आध्यात्मिक कार्य करत असूनही त्यांच्याकडे पाहिल्यावर काहीच जाणवत नाही. याचे कारण म्हणजे नियोजनबद्ध कार्य, अभ्यासपूर्ण नियोजन, ‘ईश्‍वराला काय अपेक्षित आहे ?’, यासंदर्भातील व्यापक दृष्टी, सर्वांचा विचार इत्यादी अनेक गुणांमुळे त्यांना कुठल्याच कार्याचे दडपण येत नाही.

कुंभक्षेत्री झारखंड येथील पू. (सौ.) सुनीता खेमका (वय ५८ वर्षे) झाल्या सनातनच्या ८४ व्या संत !

कुंभक्षेत्री, कुंभपर्वामध्ये, एकादशीच्या विशेष स्नानाच्या मुहुर्तावर, रामनाथी आश्रमात गुरुपादुका सप्ताह चालू असतांना कुंभ रास असलेल्या झारखंड येथील साधिका सौ. सुनीता खेमका संतपदी विराजमान झाल्या.

साधकांच्या रक्षणासाठी स्वतःच्या देहाची तमा न बाळगता सद्गुरु (सौै.) अंजली गाडगीळ करत असलेला खडतर दैवी प्रवास !

संतांना देहबुद्धी अत्यल्प असते. त्यांना देहाची जाणीव नसते’, असे आपण ऐकलेले असते.

पू. भार्गवराम प्रभु यांच्या सन्मान सोहळ्याच्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी अनुभवलेली श्रीकृष्णवेशातील पू. भार्गवराम यांची आनंददायी श्रीकृष्णलीला !

४.११.२०१८ या दिवशी मंगळूरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या पू. भार्गवराम प्रभु (वय १ वर्ष ५ मास) यांना जन्मतःच पहिले संत असल्याचे घोषित करण्यात आले.