अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत संपूर्ण कुटुंबावर साधनेचे संस्कार करणार्‍या डोंबिवली येथील श्रीमती विजया लोटलीकरआजी (वय ८६ वर्षे) या सनातनच्या ९९ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये खचून न जाता संघर्ष करत आणि सर्व लोटलीकर कुटुंबियांवर साधनेचे संस्कार करत त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणा-या श्रीमती विजया लोटलीकरआजी (वय ८६ वर्षे) या सनातनच्या ९९ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्या.

साधकांवर मायेची पाखर घालणार्‍या, तसेच सदैव सकारात्मक आणि सहजतेने वागणार्‍या पू. (सौ.) सुनीता खेमका

प्रयागराज येथे कुंभपर्वामध्ये १६.२.२०१९ या दिवशी झालेल्या एका भावसोहळ्यात झारखंड येथील सौ. सुनीता प्रदीप खेमका सनातनच्या ८४ व्या संतपदावर विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.

लहानपणापासूनच देवाच्या अनुसंधानात असणारे संभाजीनगर येथील पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६० वर्षे) !

श्री. कुलकर्णीकाका दुपारी किंवा रात्री उशिरा भेटले, तरी ते नेहमी उत्साही आणि आनंदी दिसतात. ते तेजस्वी दिसतात.

निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी संतपदी विराजमान

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी न्यायालयीन संघर्षाचे योद्धे आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांचा अपूर्व संगम असलेले निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर हे सनातनच्या ९७ व्या व्यष्टी संतपदी, तर अधिवक्ता सुरेश कुलकर्णी हे सनातनच्या ९८ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले आहेत, अशी आनंददायी घोषणा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केली.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची लहानपणापासून साधनेच्या अनुषंगाने झालेली वाटचाल – भाग २

आपल्या समोर एखादी मोठी व्यक्ती आली, उदा. संत आले, तर आपल्या मनावर एक प्रकारचे दडपण येते. येथे साक्षात् श्री दुर्गादेवी कु. अनुराधा यांच्या समोर आली, तर त्यांच्या मनावर केवढे दडपण आले असेल ! शेवटी ती जगदंबाच, आईच आहे.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची लहानपणापासून साधनेच्या अनुषंगाने झालेली वाटचाल – भाग १

‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून आतापर्यंत ९६ साधकांनी संतपद प्राप्त केले आहे, तर १५ साधक सद्गुरु पदावर आरुढ झाले आहेत. त्यांपैकी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर १२ व्या संत आणि ६ व्या सद्गुरु आहेत. (वर्ष २०१९)

विकलांग असूनही आंतरिक साधना चालू असलेले आणि दैवी गुण असलेले सांगली येथील संकेत कुलकर्णी सनातनच्या ९६ व्या संतपदी विराजमान !

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे यांच्या हस्ते परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचीही वंदनीय उपस्थिती होती. सोहळ्याचे सूत्रसंचालन कु. शिल्पा बर्गे यांनी केले.

पू. जलतारेआजी यांची कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

बालपण, वैवाहिक जीवन इत्यादी जीवनाच्या विविध टप्प्यांना परिस्थिती कशीही असली, तरी त्या आदर्श साधिकेप्रमाणे प्रेमभावाने आणि प्रसंगी साक्षीभावाने वागल्या आहेत.

ईश्‍वरावर दृढ श्रद्धा आणि विविध दैवी गुणांनी युक्त असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्रीमती कुसुम जलतारेआजी (वय ८० वर्षे) संतपदी विराजमान !

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात, शांत, समाधानी वृत्ती आणि देवाच्या कृपेसाठी तळमळणार्‍या श्रीमती कुसुम जलतारे (वय ८० वर्षे) या सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.

सतत वात्सल्यभावात राहून तळमळीने सेवा करणार्‍या तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान !

वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया (२० मे २०१९) या दिवशी मार्गदर्शन करतांना सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम यांनी मूळच्या देवरुख येथील आणि आता तपोधाम येथे सेवारत, तसेच सतत वात्सल्यभावात असणार्‍या श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) या सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली.