सनातन बनली संतांची मांदियाळी ! (भाग – ३)

संत समष्टीच्या कल्याणासाठी नामजप करू शकतात. मृत्यूनंतर त्यांना पुनर्जन्म नसतो. ते पुढील साधनेसाठी वा मानवजातीच्या कल्याणार्थ स्वेच्छेने पृथ्वीवर जन्म घेऊ शकतात.

प्रेमभाव, स्वतःला पालटण्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असलेल्या पुणे येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखलेआजी (वय ७५ वर्षे) !

आजीला गुरुकृपायोगानुसार साधना समजल्यापासून, म्हणजे मागील १५ वर्षांपासून ती पहाटे उठून मानसपूजा, नामजप, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन, सारणी लिखाण, हे सर्व व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करते.

सनातन बनली बालसंतांची मांदियाळी !

 १. पू. भार्गवराम भरत प्रभु (वय १ वर्ष ५ मास) ४ नोव्हेंबर २०१८ या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांनी मंगळुरू (कर्नाटक) येथील बालक चि. भार्गवराम भरत प्रभु (वय १ वर्ष ५ मास) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले असून ते जन्मतःच संतपदावर विराजमान आहेत’, ही ऐतिहासिक घोषणा केली. मंगळुरू (कर्नाटक) येथे ५.५.२०१७ या दिवशी … Read more

सनातनच्या संतरत्न पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा साधनाप्रवास !

गुरुदेवांनी माझ्या जन्माचे सार्थक केले. मला काहीच येत नव्हते. सनातन संस्थेत येण्यापूर्वी मला ‘अमुक मिळावे, तमुक मिळावे’, अशा व्यावहारिक इच्छापूर्तीसाठी मी पुष्कळ कर्मकांड केले;

सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या सौ. अंजली गाडगीळ यांच्याविषयी त्यांचे पती पू. डॉ. मुकुल गाडगीळकाका यांनी काढलेले गौरवोद्गार !

खडतर, म्हणजे कधी कधी १० घंटे प्रवास करणे, तिकडे गेल्यावर काही कि.मी. चालत जाऊन मंदिरात दर्शन घेणे, असे त्या करतात. त्या वेळी शारीरिक त्रासही होत असतात. असे सगळे करूनही त्या आनंदावस्थेत असतात.

जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) दुसरे बालसंत घोषित !

‘विविध दैवी गुणांचा समुच्चय असलेले चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले दुसरे संत आहेत’, असे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्याचे सनातन च्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घोषित केले.

नामसंकीर्तनाच्या माध्यमातून ईश्‍वराशी अनुसंधानात रहाणार्‍या चेन्नई येथील सौ. कांतीमती संतानम् (वय ८१ वर्षे) संतपदी विराजमान !

पू. (सौ.) कांतीमती संतानम् या ‘नामसंकीर्तन चूडामणी’, ‘भावरत्न’ आदी अनेक पदव्यांनी अलंकृत आहेत.

नम्र, उत्साही आणि आनंदी असणारे देवद येथील सनातन आश्रमातील सदाशिव सामंतआजोबा संतपदी विराजमान !

आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे, तसेच नम्र, उत्साही आणि आनंदी असणारे श्री. सदाशिव सामंतआजोबा (वय ८२ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे पू. (सौ.) अश्विनी पवार ९ ऑगस्टला यांनी घोषित केले.

मुलीला आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव !

बाहेरच्या जगातील या वयातील मुलांचे वागणे-बोलणे, आचार-विचार पहाता गुरुकृपेच्या छत्रछायेखालील मुले विचाराने कशी प्रगल्भ होतात, हे तिने लिहिलेल्या या लेखावरून लक्षात येते.

वात्सल्यभावाने साधकांना मार्गदर्शन करणार्‍या आणि त्यांना भावसागरात डुंबवणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव !

‘पू. काकूंनी (पू. (सौ.) संगीता जाधव यांनी) त्यांच्या नावाप्रमाणे आम्हाला प्रेमळ आणि मधुर स्वरात साधनेसंदर्भात सतत मार्गदर्शन करून आम्हा साधकांच्या जीवनात संगीतमय वातावरण निर्माण केले आहे.