पुणे येथील सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा व्यंकटेश मराठेआजी (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा व्यंकटेश मराठेआजी (वय ८४ वर्षे) यांचा रविवार, वैशाख कृष्ण पक्ष एकादशी (६ जून २०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दात येथे पाहूया !

कर्मयोग आणि भक्तीयोग यांचा उत्कृष्ट संगम असलेले सनातनचे ९७ वे संत पू. सुधाकर चपळगावकर यांंचा साधनाप्रवास !

सनातनचे संत पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा आज  वैशाख कृष्ण पक्ष प्रतिपदा (२७.५.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी संतपदी विराजमान झाल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना सांगितलेला त्यांचा साधनाप्रवास येथे देत आहोत.

साधनेची तीव्र तळमळ आणि ईश्‍वरावर दृढ श्रद्धा असल्याने दुर्धर आजारातही भावपूर्ण साधना करून ‘सनातनचे १०७ वे (समष्टी) संतपद’ प्राप्त करणारे अयोध्या येथील पू. डॉ. नंदकिशोर वेद (वय ६८ वर्षे) !

​वर्ष २००० पासून अयोध्या (फैजाबाद) येथे सनातन संस्थेचे कार्य चालू झाल्यावर डॉ. नंदकिशोर वेद यांनी तळमळीने सेवेला आरंभ केला. त्यांचा अहं मुळातच अल्प होता. त्यामुळे स्वतःच्या उच्च शिक्षणाचा किंवा प्रतिष्ठेचा कोणताही विचार न करता ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने ते सेवा करू लागले. त्यांचे निवासस्थान जणू साधकांसाठी आश्रमच बनले. अयोध्येत सनातनचे कार्य वाढावे, यासाठी त्यांनी सर्व स्तरांवर तळमळीने प्रयत्न केले.

सर्वांवर प्रेम करणारे आणि सर्वार्थांनी आदर्श असणारे पू. डॉ. नंदकिशोर वेद !

‘डॉ. नंदकिशोर यांच्या पित्याचे नाव श्री. राम आसरे आणि मातेचे नाव सौ. द्रौपदी होते. श्री. राम आसरे हे व्यावसायिक होते आणि त्यांना अध्यात्माची आवड होती. ते साधना करत होते. पहाटे ४ वाजल्यापासून ते श्रीरामाचा नामजप करत असत. ते संपूर्ण घराची शुद्धी करत असत. आईसुद्धा कुलदेवीचा पुष्कळ नामजप करत होत्या. अशा आध्यात्मिक घरात डॉ. नंदकिशोर यांचा जन्म झाला होता.

कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे आनंदी राहून त्याला सामोरे जाणारे पू. डॉ. नंदकिशोर वेद !

पू. डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावरही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे या दुर्धर व्याधीत त्यांनी भावजागृतीचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आनंदी आणि भावस्थितीत रहाता आले.

कठीण प्रसंगातही कृतज्ञताभावात रहाणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे कल्याण (ठाणे) येथील कै. माधव साठे (वय ७५ वर्षे) यांनी गाठले संतपद !

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सर्वांच्याच डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असतांना ‘साधनेमुळे मृत्यू आणि प्रतिकूल परिस्थिती यांना गुरुनिष्ठेच्या बळावर कसे तोंड द्यायला हवे ?’, हे पू. साठेकाकांच्या उदाहरणातून सर्वांना शिकण्यासारखे आहे.

देवाप्रती पूर्ण शरणागत आणि भोळा भाव असलेले रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. प्रियांका लोटलीकर यांनी रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे संत पू. शंकर गुंजेकर यांच्याशी साधनेचा प्रवास याविषयी साधलेला संवाद येथे दिला आहे. आज माघ शुक्ल पक्ष अष्टमी या दिवशी पू. गुंजेकरमामा यांचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा साधनाप्रवास ! (भाग २)

साधनेच्या प्रवासात स्वतःत जाणवलेले पालट आणि त्यांतून साधकांपुढे ठेवलेला आदर्श – प्रसाराला किंवा अर्पण आणण्यासाठी जातांना साधकांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्याशी प्रेमाने वागून त्यांच्या सेवेचे नियोजन करणे, सेवेमध्ये प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर प्रत्येक टप्प्यात सहभागी होणे,…

सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा साधनाप्रवास ! (भाग १)

‘पूर्वीपासून मला ‘आपला जीवनपट लिहावा’, असे वाटायचे; कारण ‘ज्याच्या अंगी मोठेपण, त्यास यातना कठीण । ’ ही म्हण माझ्या जीवनप्रवासास जुळणारी आहे. या माध्यमातून कठीण परिस्थितीतही ‘गुरूंच्या कृपेने एखाद्या जिवाचा उत्कर्ष कसा साधला जातो’, हे समाजाला सांगता यावे’, असे मला वाटायचे.

अत्यंत तळमळीने आणि भावपूर्ण मार्गदर्शन करून साधकांना अंतर्मुख करणारे पू. रमानंद गौडा !

‘सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधकांना साधनेत मार्गदर्शन करणारे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्याकडून श्री. गुरुप्रसाद गौडा यांना अनेक प्रसंगांतून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.