सनातन प्रभात नियतकालिक समूहाचे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले सनातन प्रभात समूहाचे संस्थापक संपादक आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संदेश प्रसारित करण्यासाठी त्यांनी सनातन प्रभात नियतकालिके चालू केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना झालेली गुरुप्राप्ती आणि त्यांनी केलेला अध्यात्मप्रसार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९८३ ते वर्ष १९८७ या कालावधीत अध्यात्मातील अधिकारी असलेल्या जवळजवळ ३० संतांकडे जाऊन अध्यात्माचा अभ्यास केला आणि अध्यात्मशास्त्राचे श्रेष्ठत्व लक्षात आल्यानंतर स्वतः साधनेला आरंभ केला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विविध संतांनी सन्मानांद्वारे केलेला गौरव !

संतांचे कार्य आध्यात्मिक (पारलौकिक) स्तरावरचे असल्याने त्यांना लौकिक सन्मान अन् पुरस्कार यांचे अप्रूप वाटत नाही.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन-उपचारतज्ञ परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९७१ ते वर्ष १९७८ या कालावधीत ब्रिटनमध्ये संमोहन-उपचारपद्धतीवर यशस्वी संशोधन केल्यानंतर त्यांची संमोहन उपचारतज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्ती झाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे क्रियाशक्तीला दिशा देणारे ज्ञानशक्तीद्वारे होणारे कार्य !

प.पू. डॉ. आठवले यांनी केलेली गुरुकुलासम आश्रमांची निर्मिती, साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने केलेले कार्य, ग्रंथनिर्मिती, ऑडिओ सीडी आणि व्हीसीडी यांची निर्मिती, ज्ञानशक्तीद्वारे चालू असलेले कार्य इत्यादींविषयी थोडक्यात जाणून घेऊया !

कलेचे सात्त्विक सादरीकरण होण्यासाठी संशोधन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरप्राप्तीसाठी कला, हे ध्येय ठेवून अनेक साधक चित्रकला, मूर्तीकला, संगीत, नृत्यकला, वास्तूविद्या आदी कलांच्या माध्यमांतून साधना करत आहेत.

तंजावूर, तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी यांनी सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टर यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

तंजावूर, तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात १५ ते १७.१.२०१६ या कालावधीत उच्छिष्ट गणपति यज्ञ करण्यात आला. प.पू. रामभाऊस्वामी यांनी सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टर यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार पुढे देत आहोत. १. ‘मी ज्याप्रमाणे माझे गुरु आणि समर्थ रामदासस्वामी यांना विसरू शकत नाही, त्याचप्रमाणे प.पू. डॉ. आठवले यांनाही आता विसरू … Read more

पंचतत्त्वाच्या सर्वप्रथम होणार्‍या कार्यकारी प्रकटीकरणाचा आरंभबिंदू म्हणजे प.पू. डॉक्टरांचा देह, तसेच त्यांची खोली !

प.पू. डॉक्टरांचा देह, तसेच त्यांची खोली यांच्या माध्यमातूनच सर्वप्रथम पंचतत्त्वाच्या प्रत्यक्ष कार्यकारी प्रकटीकरणाला आरंभ झाला आहे, असे लक्षात आले आहे. त्यांची प्रत्यक्ष उदाहरणे येथे देत आहे.

प.पू. डॉक्टरांच्या ग्रंथातील ज्ञानामुळे साधना करणारे जीव निर्माण होणे !

अमावास्येच्या रात्रीनंतर हळूहळू पहाट होते. त्या वेळेस सूर्याची पुसटशी लालीमा असते. ती लालीमा म्हणजे सूर्योदयाचा संकेत असतो. तसेच अंधःकाराच्या समाप्तीचा संकेत असतो. त्या लालीमेच्या उदयानेच सृष्टीत परिवर्तन होण्यास आरंभ होतो.

प.पू. डॉक्टरांचे शिष्यरूप

उच्च विद्याविभूषित असलेल्या प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या गुरूंची, परात्परगुरु प.पू. भक्तराज महाराज यांची तन-मन-धन अर्पून परिपूर्ण सेवा केली.