सनातनचे गोकुळ

भगवद्भक्ती हा जीवनाचा पाया आहे. भक्तीविना जीवन नीरस आहे. या भवसागरातून तरून जायचे असेल, तर भगवंताचा हात धरल्यावाचून तरणोपाय नाही.

श्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांची आध्यात्मिक पातळी एका वर्षात ६१ टक्क्यांवरून ६४ टक्के झाल्याविषयी सत्कार !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांचा सत्कार करण्यात आला.

भोपाळ येथील प्रा. रामेश्‍वर मिश्र, मंगळुरू येथील धर्माभिमानी श्री. दिनेश एम्.पी. आणि कल्याण येथील धर्माभिमानी अधिवक्ता श्री. विवेक भावे जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असतांना २५ जून या दिवशी तीन धर्माभिमानी साधनापथावरही आध्यात्मिक उन्नती करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले.

गोपीभावातील कु. तृप्ती गावडे यांनी कृष्णभक्ती वाढवण्याविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन

प्रत्येकाचा साधनामार्ग निरनिराळा असल्याने त्या त्या मार्गाने त्याची प्रगती होत असते. अनेक साधक म्हणतात, ‘आम्हाला गोपीभावाने साधना करायची आहे’. प्रत्येकाचे कौशल्य निराळे असते.

श्रीकृष्णभक्तीचा व्यष्टी साधनेतील टप्पा गाठल्यानंतर समष्टी भाव, तळमळ आदी गुणांमुळे समष्टी सेवेचे दायित्व सहजतेने पेलणार्‍या गोपीभावातील साधिका !

सनातन संस्थेतील गोपीभाव असणार्‍या साधिकाही आता समष्टी साधना करू लागल्या आहेत. वयाने लहान असलेल्या, विशेष शिक्षण झालेले नसतांना आणि समष्टीचा काहीच अनुभव नसतांनाही श्रीकृष्णकृपेने त्यांना ही साधना चांगल्या रितीने जमू लागली आहे.

लहानपणी भातुकलीच्या खेळात देवासाठी अन्न बनवून तो खायची वाट पहात असल्याचे आठवणे आणि आता गुरूंची तीच सेवा मिळाल्याने अपार कृतज्ञता वाटणे

खेळात भगवंतासमवेत संसार करणे आणि प्रत्यक्षातही त्याचाच संसार करायला मिळणे, तोच त्याचा खेळ खेळून घेणे अन् खेळातला आनंद देणे

गोपींमध्ये असलेले गुण

गोपींना श्रीकृष्णाचे रूप समजल्याक्षणी त्या त्याला पूर्णपणे शरण गेल्या. स्वतःचा अहं न जोपासता त्यांना श्रीकृष्णाला शरण जाता आले, ही पुष्कळ महत्त्वाची गोष्ट आहे.

गोपीभाव आणि कृष्णभाव

द्वापरयुगात मात्र सर्व वातावरणच गोपीभावाने भारून गेलेले असायचे. येथील प्रत्येक झाड-वेल, नभांगण, भूतलअंगण, गोप-गोपींची हृदये, गायी-वासरे, नद्या-जल सर्वकाही श्रीकृष्णभेटीतील भक्तीने ओथंबलेले असायचे.

श्रीकृष्णरूपी अमृतसमुद्रातील लहरी म्हणजे गोपी आणि त्या अमृतसमुद्रातील गोडपणा म्हणजे राधा !

गोपींचे माझ्यावरील प्रेम आणि माझे गोपींवरील प्रेम हेे आम्हा दोघांनाच माहिती आहे, इतरांना ते अतर्क्य आहे, असे भगवंताने उद्धवाला सांगितले. तेव्हा आपण गोपीसम झाल्यावरच आपल्याला रासलीला कळेल.

श्रीकृष्णाने सुचवलेली साधनेच्या संदर्भातील सूत्रे आणि भावावस्थेत रहाण्याचे टप्पे

आपल्याकडून चूक झाली, तर आपण देवाची क्षमा मागतो; पण चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाही. आपल्याकडून चूक होते, तेव्हा देवाची क्षमा मागून चूक लगेच सुधारायला पाहिजे, तरच ते खर्‍या अर्थाने देवाची क्षमा मागणे होते.