उतारवयातही नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ असलेले आणि प्रत्येक गोष्टीचे श्रेय गुरुदेवांना देणारे पू. भगवंतकुमार मेनराय !

रामनाथी आश्रमात काही साधकांना अरोमाथेरेपी शिकवत आहेत. पू. मेनरायकाका त्याविषयी जिज्ञासेने प्रश्‍न विचारतात आणि मला ही थेरेपी शिकायची आहे, असे म्हणतात.

सनातन अल्पावधीत व्यापक होण्यामागचे रहस्य !

सनातन संस्था अल्पावधीत विश्‍वव्यापी होण्यामागेही काही वैशिष्ट्ये आहेत; मात्र ही वैशिष्ट्ये आध्यात्मिक स्तरावरची आहेत.

मी… सनातनचे ग्रंथविश्‍व… परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धर्मदूत !

शिवाच्या जटेतून जशी गंगानदी पृथ्वीला पावन करण्यासाठी अवतरित झाली, तसे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून अखिल मानवजातीचा उद्धार करण्यासाठी सनातनच्या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानगंगा अवतरित झाली आहे !

सनातन बनली संतांची मांदियाळी ! (भाग – २)

सर्वसामान्य आणि साधना न करणा-या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते अन् प्रतिदिन देवपूजा, पोथीवाचन, उपवास इत्यादी कर्मकांडातील साधना नियमित करणा-या व्यक्तींची आध्यात्मिक पातळी २५ ते ३० टक्के असते. ७० टक्के आध्यात्मिक पातळीला व्यक्ती संतपदाला पोहोचते.

सनातनचे समष्टी दायित्व सांभाळणार्‍या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि संतांचे मन जिंकण्याचे शिवधनुष्य लीलया पेलणार्‍या अन् सूक्ष्मातील कार्य सांभाळणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ सद्गुरुपदी विराजमान !

पू. (सौ.) बिंदाताई आणि पू. (सौ.) गाडगीळकाकू या संतद्वयी यंदाच्या गुरुपौर्णिमेला सद्गुरुपदी विराजमान होतील, असे अनेक साधकांना वाटत होते.

पाऊस पडतांना त्याच्या थेंबांकडे पाहून आनंद जाणवण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा

देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये ऋतूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ऋतूंपैकी वर्षाऋतू हा भूतलावरील सर्व प्राणीमात्रांना सुखावणारा असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा क्षण म्हणजे पहिला पाऊस !

सनातनच्या विविध गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये झालेल्या कार्यक्रमांत साधकांच्या संतपदाची, तसेच सद्गुरुपदाची घोषणा !

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील श्री. अनंत (तात्या) पाटील ६१ व्या,
कपिलेश्‍वरी (गोवा) येथील सौ. सुमन नाईक ६२ व्या आणि
जोधपूर (राजस्थान) येथील सौ. सुशीला मोदी ६३ व्या संतपदी विराजमान !
सनातनचे संत पू. राजेंद्र शिंदे सद्गुरुपदी विराजमान !

माया आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम साधून झपाट्याने प्रगती करणार्‍या सौ. सुशीला मोदी संतपदी विराजमान !

गुरुपौर्णिमा, म्हणजे गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! या शुभदिनी माया आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम साधून झपाट्याने आध्यात्मिक उन्नती करणार्‍या पू. (सौ.) सुशीला मोदी (वय ६५ वर्षे) यांना सनातनच्या ६३ व्या समष्टी संत म्हणून घोषित करण्यात आले.

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी कपिलेश्‍वरी (फोंडा) येथील पू. (सौ.) सुमन नाईक सनातनच्या संतांच्या मंदियाळीतील ६२ वे संतपुष्प !

सनातन आश्रम, रामनाथी (वार्ता.) – कठीण प्रसंगांतही ईश्‍वरावर असलेली दृढ श्रद्धा, श्रीगुरूंप्रती अपार कृतज्ञताभाव, साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी निरपेक्षतेने प्रयत्न करणे आदी अनेक गुणवैशिष्ट्यांनी संपन्न असलेल्या कपिलेश्‍वरी, फोंडा येथील साधिका सौ. सुमन नाईक (वय ६७ वर्षे) या सनातनच्या ६२ व्या समष्टी संत झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या रामनाथी आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या कार्यक्रमात सर्वांना मिळाली. सनातनच्या ३ साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याच्या वार्तेने श्रीकृष्णाकडून मिळालेल्या आनंदात आणखी वाढ झाली.

साधकांवर पितृवत प्रीती करणारे सनातनचे ६ वे संत पू. राजेंद्र शिंदे सद्गुरुपदी विराजमान !

पनवेल – साधकांवर पितृवत प्रीती करणारे सनातनचे ६ वे संत पू. राजेंद्र शिंदे यांना सद्गुरुपदी विराजमान करून भगवंताने सनातनच्या साधकांना गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी अनमोल भेट दिली. नेतृत्व, नियोजनकौशल्य, तत्परता, समयसूचकता, सतर्कता, प्रीती, आर्त शरणागती, क्षात्रवृत्ती आदी गुणसमुच्चयाने युक्त असलेले पू. राजेंद्रदादा यांनी सद्गुरुपद प्राप्त केल्याचे सनातनच्या देवद आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात घोषित