आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे जनक !
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, असे सुवचन आहे. उच्च कोटीतील संत काळाच्या पलीकडीलही पाहू शकतात. अशाच उच्च कोटीतील संतांपैकी एक म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, असे सुवचन आहे. उच्च कोटीतील संत काळाच्या पलीकडीलही पाहू शकतात. अशाच उच्च कोटीतील संतांपैकी एक म्हणजे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
सर्वसामान्य माणसाचे जीवन म्हणजे चिमण्या-पाखरं करतात, तसा चार काटक्यांचा संसार ! त्यातूनही जी व्यक्तीमत्त्वे स्वार्थ त्यागून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी जगतात, ते विभूती असतात. अशा अनेक विभूती भारताने अंगाखांद्यावर खेळवल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रहाणारे पू. अनंत (तात्या) पाटील हे वर्ष २०१६ च्या गुरुपौर्णिमेला संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. ते ८३ वर्षांचे आहेत. ते वर्ष १९९४ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. सध्या ते समष्टीसाठी नामजप करतात.
पणत्यांच्या लाल रंगाच्या ज्योतीची वैशिष्ट्ये आणि त्यामागील कारणे ‘रामनाथी आश्रमात १.११.२०१६ या दिवशी रात्री ८ वाजता दिवाळीनिमित्त लावलेल्या पणत्यांच्या ज्योती लाल रंगाच्या दिसत होत्या. त्यामुळे आश्रमाच्या भिंतीही लाल रंगाच्या दिसत होत्या. एरव्ही ज्योत पिवळ्या रंगाची दिसते. ज्योती लाल रंगाच्या दिसण्याची कारणे येथे दिली आहेत. पणत्यांच्या ज्योतींतून सप्तरंगी किरण आणि कण मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होतांना दिसत … Read more
‘पूर्वीच्या काळी मासिक धर्माच्या वेळी मुली आणि स्त्रिया आवश्यक ते आचारधर्म पाळत, उदा. देव-धर्माशी संबंधित ठिकाणी वावर टाळणे, विश्रांती घेणे इत्यादी. सध्याच्या मुली आणि स्त्रिया यांनी आधुनिकतेच्या आहारी जाऊन मासिक धर्माच्या वेळी न्यूनतम पाळावयाचे आचारही सोडून दिलेले आढळतात.
एखाद्या तीर्थक्षेत्री ज्या देवतेचे तत्त्व अधिक असते, तेथे त्या देवतेशी संबंधित पशू-पक्षी अथवा वनस्पती आढळून येतात.
‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत.
या चाचणीत श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणारे श्री महालक्ष्मी यंत्र, सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि रांगोळी यांची छायाचित्रे चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या अन् ठेवल्यानंतरच्या वातावरणाची घेतलेली पिप छायाचित्रे निवडली आहेत. या तीनही छायाचित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?, हे या चाचणीद्वारे जाणता आले.
सोळाव्या शतकात राजस्थानमध्ये संत मीराबाई या थोर श्रीकृष्णभक्त होऊन गेल्या. राजस्थानातील मेडता येथे त्यांचा कक्ष, त्यांचे हस्तलिखित असलेला गवाक्ष (खिडकी) आणि त्या ज्या मूर्तीसमोर बसून भजने म्हणत, ती श्री चतुर्भुजनाथाची मूर्ती मधील स्पंदनांचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली..
आपण रहात असलेल्या वास्तूच्या परिसरात असणारी तुळशीची रोपे किंवा देवतांना जी फुले वाहाण्यात येतात त्यांची सात्त्विक झाडे आणि घरातील पाळीव प्राणी यांच्यावरही होतो, असे म्हटले जाते…