स्त्रियांनी परकीय परंपरेतून आलेले असात्त्विक पोशाख परिधान करणे अतिशय हानीकारक असल्याने ते त्यागून, हिंदु संस्कृतीनुसार आध्यात्मिक लाभ मिळवून देणारी सहावारी साडी नेसणे आणि त्याहून चांगले नऊवारी साडी नेसणे आवश्यक !
‘जीन्स, टी-शर्ट, चुडीदार यांसारखी परकीय परंपरेतून आलेली वेशभूषा ही सध्या हिंदु स्त्रीच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनली आहे. याउलट हिंदु संस्कृतीची ओळख सांगणार्या पारंपरिक नऊवारी साडीचे अस्तित्व आता बहुतांश खेडेगावापुरतेच सीमित राहिले आहे.