‘भावबळे आणा प्रभूला’, या उक्तीप्रमाणे आचरण करून जीवनात पदोपदी गुरुकृपेची अनुभूती घेणार्या पू. (सौ.) संगीता पाटील !
बालपणापासूनच कष्टप्रद जीवन जगणार्या पू. (सौ.) संगीता पाटील यांना त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, तरीही त्यांची देवावरील श्रद्धा मुळीच ढळली नाही. लहानपणी अनेक मंदिरांत भावपूर्ण सेवा केल्याने त्यांची श्रद्धा वृद्धींगत झाली आणि देवावरील त्यांच्या अतूट श्रद्धेमुळे श्री गजानन महाराज आणि साईबाबा यांच्या कृपाप्रसादे त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. नंतर सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावरही त्यांना पदोपदी गुरुकृपा अनुभवता आली.