परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या बेळगाव येथील श्रीमती विजया दीक्षित सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

श्रीमती विजया दीक्षित यांच्या ८९ व्या वाढदिवसाच्या दिनी सनातनच्या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ही आनंददायी घोषणा केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला नाथ संप्रदायाचे साहाय्य !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य जणू अवतारीच आहे. असे म्हणतात की, अवताराने कार्यासाठी जन्म घेतला की, त्याच्या त्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्याचे देवतागणही जन्म घेतात. याचीच प्रचीती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या अवतारी कार्यामध्ये साधकांना येत आहे. त्यांना विविध ईश्वरी स्त्रोतांकडून या कार्यात आपणहून साहाय्य लाभत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यावरील अरिष्टे टाळण्यासाठी विविध संतांनी केलेले साहाय्य !

‘आपण चालत असू, तर वार्‍याचा विरोध होत नाही; पण धावत असू तर वार्‍याचाही आपल्याला विरोध होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कल्याणकारी कार्याच्या संदर्भातही असेच अनुभव येत आहेत. जेथे राम-कृष्णादी अवतार आणि ज्ञानेश्वर-तुकोबांसारखे संतमहात्मे यांनाही विरोध झाला, तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला विरोध होणे, हे स्वाभाविक आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला विविध संतांनी केलेले साहाय्य

सनातन धर्माच्या पुनरुत्थानासाठी आणि त्याची अवघ्या विश्वात प्रस्थापना करण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभलेल्या कार्यात ईश्वरी कृपेने अनेक संतांनी बहुमोल वाटा उचलला किंवा त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मार्गदर्शन केले. या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, यासाठी हा लेख आहे.

आपल्या प्रीतीमय वागण्याने प्राणी आणि पक्षी यांनाही आकर्षून घेणारे अन् सुंदर बाललीलांनी सर्वांना आनंद देणारे सनातनचे दुसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !

सनातनचे दूसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्या आई सौ. मानसी राजंदेकर यांना पू. वामन यांच्यातील संतत्व दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

स्वतः भगवंतस्वरूप असूनही आई-वडिलांची कृतज्ञताभावाने, परिपूर्णतेने आणि सहजभावाने सेवा करून समाजापुढे उत्तम सेवेचा आदर्श ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सेवा करतांना प्रत्येक कृतीला भक्तीमार्गानुसार भावाची आणि कर्मयोगानुसार परिपूर्णतेची जोड दिल्यास निश्‍चितच ती कृती आध्यात्मिक स्तरावर होते; मग ‘ती कृती संतांसाठी केलेली असो किंवा आई-वडिलांसाठी केलेली असो, तिचा आध्यात्मिक लाभ मिळतोच !

शासकीय नोकरी प्रामाणिकपणे करणारे पुणे येथील पू. गजानन बळवंत साठे यांचा साधनाप्रवास !

माझा जन्म ६.१२.१९४३ या दिवशी मध्यमवर्गीय कुटुंबात माझ्या आजोळी कोल्हापूरमधील शाहूपुरी येथे झाला. मी माझे २ धाकटे भाऊ, २ धाकट्या बहिणी आणि विधवा आत्या यांच्यासह पुण्यातील नारायण पेठेत भाड्याच्या जुन्या घरात राहून शिक्षण घेत होतो.

शांत, नम्र, आनंदी आणि उतारवयातही तळमळीने, तसेच सेवाभावी वृत्तीने सेवा करणारे पुणे येथील सनातनचे १११ वे संत पू. गजानन बळवंत साठे (वय ७७ वर्षे) !

पुणे येथील श्री. गजानन बळवंत साठे (वय ७७ वर्षे) गेल्या १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते उच्चशिक्षित आहेत.

कष्टाळू, कठीण परिस्थितीला धिराने सामोर्‍या जाणार्‍या, तळमळीने सेवा करणार्‍या पुणे येथील पू. (श्रीमती) उषा मधुसूदन कुलकर्णी !

‘आईला अनेक वर्षांपासून निद्रानाशाचा विकार आहे, तरी ती दिवसभर उत्साही असते. आईची २ वेळा ‘अँजिओप्लास्टी’ (हृदयाचे शस्त्रकर्म) करावी लागली. त्यामुळे तिचे जेवण आणि हालचाली यांवर पुष्कळ बंधने आली आहेत, तरी ती सतत आनंदी असते.