भगवान श्रीकृष्णाची शिकवण देणारी कृष्णमय चित्रे (भाग २)
श्रीकृष्णाने समृद्ध अशी स्वर्गभूमी दाखवून
भोगभूमी आणि योगभूमी यांतील भेद लक्षात आणून देणे
श्रीकृष्णाने समृद्ध अशी स्वर्गभूमी दाखवून
भोगभूमी आणि योगभूमी यांतील भेद लक्षात आणून देणे
‘हे ईश्वरा, ज्याप्रमाणे तू स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळ व्यापून टाकले आहेस, त्याप्रमाणे माझे मन, बुद्धी आणि अहं यांनाही तू व्यापून टाक’, ही प्रार्थना वाचून भगवान श्रीकृष्णाने साधिकेला हे चित्र रेखाटण्याची प्रेरणा दिली.
द्रौपदीप्रमाणे संपूर्ण शरणागतभावाच्या स्थितीत असलेल्या हिंदू महिलांच्या रक्षणासाठी, त्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण येत आहे, असे दाखवले आहे.
प्रल्हादाच्या उद्धारासाठी सत्ययुगात जसा श्रीविष्णु नरसिंहावतार धारण करून भक्तीस्तंभातून प्रगटला, तसा श्रीविष्णूची निस्सीम भक्ती झाल्यावर कलियुगात प.पू. डॉक्टरांच्या रूपाने श्रीविष्णूचा नरसिंहावतार गुरुकृपेच्या स्तंभातून प्रगटला आहे.
‘आम्ही श्रीकृष्णाची बालके आहोत आणि त्याच्या मांडीवर बसून संगणकासमवेत खेळत आहोत. आम्हाला काहीही ठाऊक नसतांना श्रीकृष्णच आमच्याकडून संगणकावर काहीतरी करून घेत आहे.
चित्रीकरण करायचे असल्याने उपनेत्र (चष्मा) न घालता चित्र काढत असतांना मला काहीच स्पष्टपणे दिसत नव्हते. माझे मन अत्यंत शांत होते. याच अवस्थेत मी ते चित्र पूर्ण केले.
ईश्वराप्रती आपला बालकभाव, गोपीभाव किंवा राधाभाव यांपैकी कोणताही भाव असला, तरी त्यासमवेत काळानुसार क्षात्रभावही आवश्यक आहे. त्यामुळे या चित्रात श्रीकृष्ण मला तलवार देऊन ती कशी चालवायची, हेही चिकाटीने शिकवत आहे.
साधिकेने रामनवमीच्या दिवशी जयपूर येथे श्री लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेतले. सुंदर वस्त्रालंकार आणि आभूषणे यांमुळे श्री लक्ष्मी मातेसह तेजस्वी दिसणार्या भगवंताचे रेखाटलेले चित्र पाहूया.
साधना योग्य तर्हेने केली, तर ६० टक्के पातळी गाठली जातेच.