हिंदु धर्माचे धर्मचिन्ह ‘ॐ’ची उत्पत्ती आणि त्याचे परिणाम
‘ॐ’ हे मूळ ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे बीज आहे. ब्रह्मांडनिर्मितीच्या काळात उत्पत्तीस्वरूप कार्य करण्यासाठी उत्पत्तीबीज हे निर्गुणातून सगुणाच्या (पंचतत्त्वांच्या) प्रत्येक टप्प्यावर त्या-त्या सगुणत्वाशी निगडित स्तरावर कार्यरत झाले.