सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असलेल्या मंगळुरू येथील सनातनच्या १३१ व्या संत पू. (सौ.) शशिकला किणी (वय ७७ वर्षे) !

अक्कांमध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञताभाव आहे. दिवसभरातील प्रत्येक कृती झाल्यावर त्या प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. यातून ‘मला पुष्कळ आनंद मिळतो’, असे त्या सांगतात. ‘गुरुदेवांनी माझा हात पकडून मला येथपर्यंत आणले’, या विचाराने प.पू. गुरुदेवांप्रती त्यांचा कृतज्ञताभाव दाटून येतो.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सतत समवेत आहेत’, असा भाव असणार्‍या सनातनच्या १३० व्या संत उजिरे, कर्नाटक येथील पू. (श्रीमती) कमलम्मा (वय ८१ वर्षे) !

कमलम्मा यांच्या मनात ‘साधनेमुळे स्वतःला जसा लाभ झाला आहे, तसा लाभ सर्वांना व्हायला पाहिजे’, अशी तळमळ आहे. त्यामुळे भेटणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्या साधना करायला सांगतात. आतापर्यंत त्यांनी ‘वर्गणीदार बनवणे, ग्रंथप्रदर्शन कक्ष लावणे आणि प्रसारसेवा करणे’, अशा सेवा केल्या आहेत.

सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती भाव असलेले पुत्तुर, कर्नाटक येथील सनातनचे १२९ वे संत पू. सांतप्पा गौडा (वय ८१ वर्षे) !

पुत्तुर येथील साधकांना काही अडचण आली, तर ते मामांचे मार्गदर्शन घेतात. मामा त्यांना भावाच्या स्तरावर मार्गदर्शन करतात. श्री. सांतप्पामामा म्हणजे पुत्तुर येथील साधकांचा आधारस्तंभच आहेत. ‘साधकांना साहाय्य करणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे’, असे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत.

कर्नाटकातील श्री. सांतप्‍पा गौडा (वय ८१ वर्षे), श्रीमती कमलम्‍मा (वय ८१ वर्षे) आणि सौ. शशिकला किणी (वय ७८ वर्षे) संतपदी विराजमान !

‘कर्नाटकच्‍या साधकांचे अहोभाग्‍य आहे की, एकाच दिवशी ईश्‍वराने ३ संतरत्नांच्‍या रूपात त्‍यांना अनमोल भेट दिली आहे. ‘दक्षिण कन्‍नड’ या जिल्‍ह्यातील ३ साधकांनी एकाच दिवशी संतपद प्राप्‍त करणे’, ही सनातनच्‍या इतिहासातील एक अपूर्व घटना आहे.

सनातनच्या ११३ व्या व्यष्टी संत अनगोळ (बेळगाव) येथील पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

माझा अध्यात्माकडे ओढा असल्याने विविध आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करता यावा, यासाठी मी परीक्षा दिल्या आणि त्यांत मी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे त्वरित आणि तंतोतंत आज्ञापालन करणार्‍या अन् वर्षाला ५ टक्के इतक्या वेगाने प्रगती करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करणार्‍या सनातनच्या पहिल्या संत प.पू. (कै.) श्रीमती विमल फडके !

३.१२.२००२ या दिवशी प.पू. डॉक्टरांनी प.पू. फडकेआजींच्या निवासस्थानी येऊन त्यांना ‘सनातनच्या पहिल्या संत’ घोषित केले. २०.५.२००३ या दिवशी प.पू. फडकेआजींचा ७५ वा वाढदिवस देवद आश्रमातील साधकांनी भावपूर्णरित्या साजरा केला.

सनातनच्या ८४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सुनीता प्रदीप खेमका (वय ६३ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पू. (सौ.) सुनीता खेमका यांचा बालपणापासून ते आतापर्यंतचा साधनाप्रवास येथे दिला आहे. त्यांचे बालपण, बालपणापासून त्यांच्यात असलेले दैवी गुण, देवाप्रती असलेली भक्ती, सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागण्याआधी त्यांनी अनुभवलेली देवाची अपार कृपा हे येथे दिले आहे.

प्रामाणिकपणे समाजसाहाय्य करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्यभाव असणारे संभाजीनगर येथील सनातनचे १२४ वे (व्यष्टी) संत पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७४ वर्षे) !

सनातनचे १२४ वे (व्यष्टी) संत पू. सत्यनारायण रामअवतार तिवारी यांचा आज मार्गशीर्ष कृष्ण तृतीया (३०.१२.२०२३) या दिवशी ७४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची मुलगी होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी त्यांचा उलगडलेला साधनाप्रवास

अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘मला उच्च रक्तदाबाचा थोडासा त्रास आहे’, हे परात्पर गुरु डॉक्टरांना ठाऊक होते. त्यांनी ‘प्रवासात मला काही त्रास झाल्यास वैद्यकीय साहाय्य मिळावे’, यासाठी आधुनिक वैद्या असलेल्या एका साधिकेला माझ्या समवेत पाठवले होते. परम दयाळू गुरूंनी ही सोय केल्यामुळे मी अमरावती येथे सकाळी ६ वाजता पोचू शकलो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी अपार भाव असलेले देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै (वय ७३ वर्षे) ! (भाग २)

मला गुरुदेवांना भेटण्याची संधी मिळाली. तेव्हा गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुम्हाला भेटल्यावर ‘तुमचे मन स्थिर आणि शांत झाले आहे’, असे माझ्या लक्षात आले. तुमची कुंडलिनी जागृत झाली आहे. त्यामुळे तुमचे मन शांत अन् स्थिर झाले आहे.’’ त्यांचे हे बोल म्हणजे गुरुदेवांकडून मला मिळालेला आशीर्वाद आहे.