निरोगी शरिरासाठी परिहाराविरुद्ध आहार घेणे टाळा !
आयुर्वेदीय आहारमंत्र’ या माझ्या पुस्तकात भोजनविधीची सविस्तर माहिती दिली आहे. भूक लागल्यावर हात स्वच्छ धुऊन उष्ण, ताजे, स्निग्ध पदार्थ एकाग्रचित्ताने आणि पोटात थोडी जागा ठेवून जेवावे, असे काही नियम आहेत. ते धाब्यावर बसवून घेतलेला आहार म्हणजे ‘विधीविरुद्ध आहार’ होय.