आगामी भीषण काळाला सामोरे जाण्यासाठी प्रथमोपचार शिका !
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन हृदयविकारासारख्या काही गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असणे, आधुनिक यंत्रांच्या वापराने अपघातांत वाढ होत असणे आदी कारणांसह भावी तिसरे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती, दंगली आदींचाही विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून प्रत्येक सुजाण नागरिकाने ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेणे आवश्यक आहे.